बारामतीत 85 टक्के मतदान

बार कौन्सिल निवडणुकीसाठी वकिलांत उत्साह
बारामती – बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाच्या निवडणुकीत बारामतीमध्ये उच्चांकी मतदान झाले एकूण 580 मतदारांपैकी 488 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
बारामती वकिल संघटनेचे अध्यक्ष डी. टी. शिपकुले व सर्व सदस्य तसेच न्यायालयातील कार्यालयीन अधिक्षक यांच्या देखरेखी खाली निवडणूक प्रक्रीया पार पडली.

राज्यातून एकूण 164 उमेदवार या निवडणुकीसाठी उभे असुन 25 उमेदवार निवडुन येणार आहेत. प्रत्येक वकिलाला एकूण 25 मतदानाचा अधिकार आहे. प्रत्येक उमेदवाराला क्रमवारीनुसार आपल्या पसंतीचे मत द्यायचे आहे. वकिलांसाठी त्यांच्या अडचणींवर उपाययोजना, त्यांना वकिलीची सनद देणे व सर्व कामे या संघटनेमार्फत केली जातात. यंदा बारामतीचे ऍड. हरीश तावरे व ऍड. सुधीर पाटसकर हे उमेदवार आहेत. बारामती न्यायालयाअंतर्गत असलेल्या दौंड व इंदापुरच्या वकिलांची देखील संख्या मोठी आहे तसेच या उमेदवारांनी गेले तीन ते चार महिन्यांपासुन महाराष्ट्रभर दौरे केले आहेत तसेच फक्त बारामतीतून 488 इतके उच्चांकी मतदान झाले आहे. यामुळे बारामतीला नक्की प्रतिनिधीत्व मिळेल, अशी भावना ज्येष्ठ वकिल ए. व्ही. प्रभुणे, बारामती वकिल संघटनेचे माजी अध्यक्ष ऍड. अमर काळे, ऍड. एस. एन. जगताप, ऍड. महेश देवकाते, ऍड. स्वाती गिरंजे, ऍड. भगवान खारतुडे, ऍड. रमेश कोकरे, ऍड. गणेश आळंदीकर आदी वकिलांनी व्यक्त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)