बारामतीत 24 दिवसांत 80 हृदय शस्त्रक्रिया

बारामती- ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी सुरू केलेल्या अनंत आरोग्य अभियान आणि कै. रा. तु. भोईटे आरोग्य प्रतिष्ठानच्या संयुक्‍त विद्यमाने सलग दुसऱ्या वर्षी सुरू असलेल्या ऍजिओग्राफी व अँजिओप्लास्टी शिबीरात 24 दिवसांत 80 हृदयशस्त्रक्रिया झाल्या. सध्या दररोज चार ते पाच शस्त्रक्रिया होत असून रुग्णांची मागणी लक्षात घेता या शिबिरात मागील वर्षीचे शस्त्रक्रियांचे आकडे यंदा मोडीत निघण्याची चिन्हे आहेत. रोहित पवार यांनी दीड वर्षांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वडिलांच्या नावाने अनंत आरोग्य अभियान सुरू केले. यामध्ये सरकारी योजनांचा लाभ मिळू शकणाऱ्या, परंतू त्यासाठीच्या पूर्वतपासणीचाही खर्च पेलवत नसलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी त्यांनी आर्थिक भार उचलण्याची योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत रोहित पवार व डॉ. रमेश भोईटे हे हा संयुक्त उपक्रम मागील वर्षांपासून राबवित आहेत. मागील वर्षी याच योजनेतून 110 अँजिओप्लास्टी पार पडल्या. सध्या बारामतीतील गिरीराज हॉस्पिटल येथे 12 नोव्हेंबरपासून हे शिबिर सुरू असून बुधवार (दि. 12) पर्यंत त्याची मुदत आहे. सध्या राज्यभरातून हृदयाचा त्रास असलेले रुग्ण या शिबिरात सहभागी होत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)