बारामतीत सुप्रिया सुळे, शरद पवार यांना निवडणूक अवघड?

लोकसभेसह विधानसेभेत “राष्ट्रवादी’ विरोधात लढण्याची “भाजप’ कार्यकर्त्यांची मागणी

पुणे: बारामती लोकसभा भाजपकडे आणि विधानसभा शिवसेनेकडे असा “युती’धर्म असला तरी 1991 पासून बारामती लोकसभा भाजप लढवित आला आहे. त्यामध्ये चांगली मते उमेदवाराला मिळाली आहेत. गेल्यावेळीही राष्ट्रीय समाज पक्षानेही दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवीत राष्ट्रवादीला जेरीस आणले होते. याउलट विधानसभेला शिवसेना नेहमीच मागच्या क्रमांकावर राहत आली आहे. यामुळे विधानसभाही भाजपने लढवावी, अशी, मागणी पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून गेल्या दोन-तीन टर्म पासून होत आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना देवेंद्र फडणविस यांनीही याबाबत आग्रह धरला होता. त्यामुळे यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत चर्चा करून निर्णय झालाच तर खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमाणेच अजित पवार यांनाही विधानसभा निवडणूक अवघड ठरू शकते.

-Ads-

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: तसेच पवार कुटुंबियांपैकी नवे कोणीही निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर तसेच पुणे आणि शिरूर मतदार संघ राष्ट्रवादीकडे नसतानाही त्या ठिकाणी उमेदवारी देण्याबाबतची चर्चा पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी विशेष बैठकीत केल्याने सर्वच लोकसभा आणि विधानसभा मतदार संघाबाबत विविध ठोकताळे बांधले जावू लागले आहेत. शिवाय, बारामती मतदारसंघावरही आता विरोधकांनी डोळा ठेवून तयारी सुरू केली आहे.
बारामती विधानसभेची जागा कित्येक वर्ष शिवसेनेकडे आहे. मात्र, भाजप ही जागा लढण्यासाठी इच्छुक आहे. या जागेबाबत शिवसेनेशी भाजपने वेळोवेळी बोलणीही केली आहेत. परंतु, खासदार सुप्रिया सुळे तसेच माजी आमदार अजित पवार यांचा विचार करून राजकीय आव्हान खोडून काढण्यासाठी पक्षाध्यक्ष पवार यांनी बारामती मतदार संघात कट्टर विरोधक तयार होवू दिलेला नाही.

लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघातून खासदार सुप्रिया सुळे गेल्यावेळी (2014) काठावर पास झाल्या होत्या. बारामती तालुक्‍यातूनच सुळे यांना कमी मतदान झाले, याशिवाय भोरमधूनही त्यांना मते मिळाली नव्हती. इंदापुर तालुक्‍यातून घेतलेल्या आघाडीमुळे अवघ्या 69 हजार 719 मतांच्या फरकाने सुळे कशाबशा खासदार झाल्या. तसेच, विधानसभेचा विचार करता अजित पवार यांना भाजपच्या उमेदवाराने चांगली लढत दिल्याने पवार यांचा 89 हजार 791 मतांनी विजय झाला होता. परंतु, त्यानंतरच्या काळात बारामती तालुक्‍यातील जिरायती भागातील 22 गावांकडे असलेले दुर्लक्ष, घोंगडी बैठकांत केले गेलेली वक्तव्य यामुळे पवार यांच्या विरोधात निर्माण झालेली नाराजी अद्यापही कायम आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विषयीही या गावात नाराजी आहे.

बारामती भाजप कार्यकर्ते…

केंद्र आणि राज्यात सत्ता आल्यानंतर बारामती तालुक्‍यात भाजपचा जनसंपर्क चांगला वाढला आहे. तालुक्‍यातील प्रत्येक गावात भाजपचा कार्यकर्ता तयार झाला आहे. याबाबी लक्षात घेता बारामती मतदार संघातून भाजपने लोकसभा तसेच विधानसभा निवडणूक लढावावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याकरिता वरिष्ठ पातळीवर शिवसेनेशी चर्चा करण्याची तयारी असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. यामुळे असा निर्णय झालाच तर सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांना बारामतीतून निवडणुका लढणे तेवढेही सोपे राहणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
421 :thumbsup:
2 :heart:
8 :joy:
3 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)