बारामतीत सत्ताधाऱ्यांना उपोषणाची डोकेदुखी

नगरपरिषेदेच्या माध्यमातून विधायक व लोकाभिमुख, अशी विकासकामे केली जात आहेत. राज्यातच नव्हे, तर देशात देखील बारामतीच्या विकासाची चर्चा होते. विकासकामात आडकाठी आणून नागरिकांची सहानभूती मिळवण्याचा केवीलवाणा प्रयोग विरोधक करीत आहेत. उपोषणांचे भांडवल करण्यापेक्षा नागरिकांच्या खऱ्या गरजा काय आहेत. त्या कशा पद्धतीने सोडवता येतील, असा सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे गरजेचे आहे.
पौर्णिमा तावरे, नगराध्यक्षा, बारामती, नगरपरिषद

विरोधकांकडून विविध विषयांवर राष्ट्रवादी टार्गेट; आत्मचिंतन करण्याची वेळ

बारामती – बारामती नगरपरिषदेच्या कारभारा विरोधात काही महिन्यांपासून नगरपरिषेदेसमोर जोरदार उपोषणे केली जात आहेत. भाजप तसेच इतर विरोधकांनी वेगवेगळ्या विषयांवर केलीली ही उपोषणे सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी ठरत असून ही उपोषणे सत्ताधारी मंडळींना विचार करण्यास भाग पाडणारी आहेत.

बेकायदा बांधकाम, कामातील अनियमितता, रस्त्यांचे प्रश्‍न घेऊन सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी विरोधक वारंवार रस्त्यावर उतरत आहेत. राष्ट्रवादीची एकहाथी सत्ता असलेल्या आणि राज्यात आदर्शवत नगरपरिषेदेतील सत्ताधाऱ्यांना भाजप कार्येकर्त्यांनी नागरिकांच्या प्रश्‍नांवर भांडावून सोडले आहे. उपोषणाच्या माध्यमातून नगरपरिषेदेवर भाजप कार्येकर्त्यांचा हल्लाबोल सुरू आहे. मुलभूत प्रश्‍नांसाठी नागरिकांवर उपोषण करण्याची वेळ येत असेल, तर नुकताच “अ’ वर्ग प्राप्त केलेल्या नगरपरिषेदेच्या कामकाजाचा दर्जा घसरत आहे का? अशी शंका बारामतीकरांच्या मनात निर्माण होत आहे.
बारामती नगरपरिषेदेच्या विविध विकासकामांवर शंका उपस्थित करीत विरोधकांनी नगपरिषेदेतील नेतेमंडळींना जेरीस आणले आहे. विकासकामे करताना पारदर्शकतेचा अभाव असल्यानेच सत्ताधारीमंडळींवर ही वेळ आली आहे. गेल्या काही महिन्यांत बारामती नगरपरिषेद समोर विविध विषयांच्या अनुषंगाने उपोषणे सुरू आहेत. जामदार रस्त्यासाठी 42 दिवस उपोषण झाले. त्यानंतर भिगवण चौक विस्तारीकरणासाठी चौकातील व्यावसायीक गाळे, इमारत बेकायदेशीर असल्याची तक्रार झाली. याविरोधात 16 दिवस उपोषण झाले. त्यावेळी निर्माण झालेली परस्थिती आणि सत्ताधाऱ्यांची उडालेली त्रेधा सर्व बारामतीकारांनी पाहिली. बारामती शहरातील नव्याने बांधण्यात आलेल्या श्री गणेश मार्केटच्या गाळे व ओटे धारकांच्या बाबत देखील तेच घडले. त्यामुळे नगरपरिषेदेवर मोर्चे काढण्यात आले. यावेळी विरोधी नगरसेवकांनी ओटेधारकांची यादी मिळत नसल्याने उपोषण केले. शहरातील व्यावसायिक गाळ्यांच्या भाड्यांमध्ये समनाता नसल्याचे सांगत पाडव्याच्या दिवशी नगरपरिषेदेवर भाजप कार्यकर्त्यांनी काळी गुडी उभारुन उपोषण सुरु केले आहे. या वेगवेगळ्या उपोषणांमुळे बारामतीच्या विकासातील परदर्शक कारभारावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. विरोधकांची वाढती आंदोलने व उपोषणे ही याचे द्योतक आहे. राष्ट्रवादीसाठी धोक्‍याची घंटा मानली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)