बारामतीत शेतकरी रस्त्यावर

जळोची- शहराचे वाढते औघोगिकीकरण, वाढती लोकसंख्या व भाजीमंडईमधील सुविधांवर असणारा ताण लक्षात घेता या सर्वबाबींचा विकासात्मक निर्णय घेऊन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत कोट्यवधी रुपये खर्चुन बारामतीत भाजीमंडई बांधली मात्र, तरी देखील भाजीमंडई सोडून शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावर दुकाने थाटले आहे.
माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते मंडईचे उद्‌घाटन करण्यात आले होते. मात्र, कोटी रुपये खर्च करुन सुद्धा मंडई थेट रस्त्यावर असल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे नागरिक सांगतात. शेतकऱ्यांनी रस्त्यावर दुकाने थाटल्यामुळे शहरातील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. प्रशासकीय भवन, काटे, हॉंस्पिटल, व मंडईच्या बाजूचा परिसर व्यापन टाकला आहे. तर खरेदीसाठी आलेले ग्राहक आपली वाहने रस्त्याच्या मधोमध मनमानी पद्धतीने लावली जात असल्याने हा रस्ता मंडईच्या वेळेस “ब्लॉक’ होत आहे. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा कोंडी निर्माण होते. नगरपालिका प्रशासनाचे यावर नियंत्रण नसल्यामुळे दर गुरुवारी याठिकाणी छोटे-मोठे अपघात घडत असताता. त्यामुळे नगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करुन सुद्ध भाजीमंडई नावालाच असल्याचे समोर आले आहे.
आठवडे बाजारात शेतकरी बारामती तालुक्‍याच्या परिसरातील असतात. जागे अभावी आम्हाला थेट रस्त्यावर बसावे लागत असल्याचे नवनाथ कोळेकर या शेतकऱ्याने सांगितले. मंडईमध्ये अनेक ठिकाणी वाहने लावल्या जातात. व जागा देखील आम्हालां मिळत नाही. त्यामुळे पोटासाठी जागा मिळेल त्याठिकाणी बसावे लागते. अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्‍त केली. आज (गुरुवारी) दुपारी चारच्या सुमारास इंदापूर रस्त्याजवळ एक छोटा अपघात या अपघाताचे कारण म्हणजे रस्त्यावर थाटलेली दुकानेच. मंडई खरेदी करत असताना एका छोट्या 12 वर्षीय मुलांला वाहनाचा धक्का लागल्याने तो किरकोळ जखमी झाला आहे.

  • ढीसाल नियोजनचा फटका
    वाहतुकीचा ताण व त्रास कमी व्हावा या हेतूने नगरपालिका व प्रशासनाने भव्य अशी इमारत बांधली आहे. मात्र ढिसाळ नियोजनाअभावी नागरिकांना नाहक त्रासाला समोरे जावे लागत असल्याचे चित्र दर गुरुवारी बारामतीत पाहवयास मिळत आहे. तसेच आठवडे बाजारात गर्दीत पाकीटमारीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे, त्यामुळे नगरपालिकेने योग्य नियोजन करणे गरजेचे बनले आहे.
  • रस्त्यावर शेतकरी बसल्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते, रस्ता मोकळा ठेवून आठवडे बाजार भरविण्याचे योग्य नियोजन केले जाईल.वाहनांवरती कारवाई ही केली जाईल.
    -पौर्णिमा तावरे, नगराध्यक्ष, बारामती नगरपालिका
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)