बारामतीत रामोशी समाजाचा मोर्चा

बारामती- अनुसुचित जमातीच्या आरक्षणासह इतर मागण्यांसाठी रामोशी समाजाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले. बारामती येथील प्रांत कार्यालयवार शेकाडो कार्येकर्त्यांनी आज (गुरुवारी) मोर्चा कढला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत आरक्षणाची मागणी करण्यात आली. तसेच आरक्षणाच्या मागणीचे निवेदन प्रशासनाला देत बापट आयोगाच्या मागण्या मान्य करा, अन्यथा रस्त्यावर उतरु असा इशारा जय मल्हार क्रांती सेनेच्या वतीने वतीने देण्यात आला.
आरक्षणाची चळवळ एक वर्षापासून सुरू आहे. शासनाकडून केवळ आश्‍वासने दिली जात आहेत. 16 ऑगस्टपासून राज्यात समाजाच्या वतीने आंदोलने सुरु आहेत. याबाबत सरकारणे तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राजकीय क्षेत्रात देखील संधी मिळणे गरजेचे आहे. आरक्षणामुळे हा बदल घडणार असून सरकारे रामोशी समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे, अशी मागणी केली. आंदोलनादरम्यान अनेक समाजबांधवांनी सरकारला धारेवर धरीत आरक्षणाची मागणी केली. मागणी मान्य झाली नाही, तर सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा ज्येष्ठ नेते मोहन मदने, बबनराव खोमणे, शरदा खोमणे, बदामराव माकर, संजय जाधव यांनी दिला.
सातारा, सांगली अहमदनगर, सोलापूर तसेच पुणे जिल्ह्यातील समाजातील विविध संघटनांनी बारामती प्रांत कार्यालयावर काढलेल्या मोर्चात सहभाग घेतला होता. क्रांतीवीर उमाजी नाईक यांचे वंशज रमन खोमणे, महिलाध्यक्षा गौरी चव्हाण, सुनिल चव्हाण, सुनिल धीवार आदींसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

  • शासनाच्या विकासात्मक व कल्याणकारी योजनांच्या लाभापासून हा समाज वंचित आहे. त्यामुळे अनुसुचित जमातीचे आरक्षण समाजाल मिळावे, अशी मागणी आहे. यासाठी सरकारकडे वेळोवेळी मागणी केली आहे. मात्र, सरकार दरबारी त्याची दखल घेतली जात नाही. राज्यातील रामोशी समाज आक्रमक झाला आहे. अनुसुचित जमातीबरोबरच राजकीय आरक्षण देखील महत्त्वाचे आहे. त्यासाठी लढा उभारण्यात आला असून वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी समाजाने ठेवली आहे.
    – दौलत शितोळे, अध्यक्ष, जय मल्हार क्रांती सेना, महाराष्ट्र राज्य

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)