बारामतीत मीच उमेदवार…

नव्या चर्चेला सुरुवात
महदेव जानकर यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना टक्कर दिली होती. ही निवडणूक तेव्हा देशात चर्चेची राहिली होती. मात्र निवडणुकीनंतर त्यांचा या मतदारसंघाशी संपर्क नसल्याचा आरोप करण्यात येत होता. आता जानकर यांनी पुन्हा बारामतीतून लढण्याची इच्छा व्यक्त केल्याने नव्या चर्चेला सुरवात होणार आहे.

पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांचा दावा : त्यावेळी शेट्टी, खोत यांचे षड्‌यंत्र

बारामती- लोकसभेच्या सहा व विधानसभेच्या 50 जागा भारतीय जनता पक्षाकडे मागणार आहे. अर्थात त्यात तडजोड होईल. राष्ट्रवादी व कॉंग्रेसला सत्तेपासून रोखणे हेच ध्येय असल्याने बारामतीचा उमेदवार मीच असेन आणि ही निवडणूक मीच जिंकेन, असा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी आज (बुधवारीए) बारामतीत केला.

-Ads-

जानकर यांनी दिवंगत पत्रकार महेंद्र कांबळे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध विषयांवर माहिती दिली. बारामती, माढ्यासह सहा जागा आम्ही मागणार आहोत. मागील लोकसभेच्या वेळीच मला माढा मतदारसंघ हवा होता. मात्र, राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या पक्षाचे हित समोर ठेवून षड्‌यंत्र केले व त्यांच्याकडे तो मतदारसंघ घेतला. मी पक्षाचा अध्यक्ष आहे. मी कोठूनही लढू शकतो. बारामतीतूनच लढण्याला प्राधान्य असेल, असे त्यांनी नमूद केले.

धनगर आरक्षणा संदर्भात पत्रकारांनी जानकर यांना प्रश्‍न विचारले असता ते की, यासाठी कमिटी नेमली आहे. तिचा अहवाल सकारात्मक येईल, तेव्हा सरकार निश्‍चित आरक्षण लागू करेल. केंद्र व राज्य सरकार सकारात्मक आहे. धनगर समाजाचे नेतृत्व करण्याची इच्छा तरुणांना असली तरी केवळ आरक्षण-आरक्षण म्हणून चालणार नाही. आम्ही सत्तेत आलो, ते काही एकट्या समाजाच्या बळावर नाही. जर कोणी केवळ आरक्षणामुळे महादेव जानकर सत्तेपर्यंत पोचले असे म्हणत असतील तर ते चुकीचे आहे. सत्ताधाऱ्यांबाबत राग असू शकतो. मात्र, आरक्षणाबाबतची प्रक्रिया सुरू आहे. धनगर समाजाच्या युवकांनी संयमाने घ्यायला शिकावे, असा सल्ला त्यांनी दिला.

पगडीवरुन राजकारण पेटले….
पुण्यातील हल्लाबोल समारोप प्रसंगी शरद पवारांनी पुणेरी पगडी राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून हद्दपार करुन यापुढे फुले पगडी वापरण्याचे आवाहन केल्याने आता पगडी वरुन चांगलेच राजकारण रंगल्याचे दिसून येत आहे. आज बारामतीतील पत्रकार परिषदे दरम्यान राज्याचे दुग्ध व मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी बारामतीकरांना कोणती पगडी कधी वापरायची हे चांगल माहित असल तरी जनतेलाही तुम्हाला कोणती पगडी घालायची हे चांगल माहीत आहे असा टोला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे नाव न घेता लगावला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)