बारामतीत ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ यशस्वी

file photo

मुलगी शाप नसून वरदान आहे, मुलगी वाचली पाहिजे आणि शिकली पाहिजे, मुलगी शिकली, तर ती दोन घरांच भविष्य उज्वल करीत असते, यासाठी महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत मुलगी वाचवा मुलगी शिकवा जाणीव जागृती अभियान रथयात्रा घेण्यात आली आहे. तसेच यापुढे अंगणवाडी बालकांना दैनंदिन आहारात पोषकवडी देण्यात येणार आहे. यामुळे बालकांचा बौद्धिक विकास अधिक प्रबळ होईल. – मिथुनकुमार नागमवाड, बालविकास प्रकल्प अधिकारी, पंचायत समिती बारामती

जळोची – बारामती येथे बेटी बचाओ बेटी पढाओची मोहीम उत्कृष्टरित्या पार पडली. महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत मुलगी वाचवा मुलगी शिकवा जाणीव जागृती अभियान रथयात्रा घेण्यात आली होती. त्यानिमित्त बारामती पंचायत समिती येथे मान्यवरांच्या हस्ते या रथयात्रेचे उद्‌घाटन करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रोहिणी तावरे, सभापती संजय भोसले, प्रमोद काळे उपसभापती शारदा खराडे, पंचायत समिती सदस्य प्रदीप धापटे, रोहित कोकरे, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, मिलिंद मोरे, बाल प्रकल्प अधिकारी मिथुनकुमार नागमवाड, विस्तार अधिकारी ए. के. खांडेकर, दत्तात्रय खंडाळे, संजीव मारकड, एल. एल. वाघ, आरोग्यअधिकारी महेश जगताप, पुनम मराठे, विलास बंडगर, दीपक नवले, सर्व पर्यवेक्षीका, अंगणवाडी सेविका व बालके उपस्थित होते. दरम्यान, ही रथयात्रा पणदरे, पिंपळी, माळेगाव येथील अंगणवाड्यांना भेट देऊन त्या ठिकाणी चित्रफीतद्वारे ग्रामस्थांना बेटी बचाव बेटी पढाओचा संदेश देऊन बालकांना पोषक वडी देण्यात आल्या, असल्याची माहिती बालप्रकल्प अधिकारी मिथुनकुमार नागमवाड यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)