बारामतीत बनावट ग्रामपंचायती?

पुणे- बारामतीतील बनावट ग्रामपंचायत भ्रष्टाचारप्रकरणी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी चार अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. बोगस ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झालेला भ्रष्टाचार खोदून काढण्यासाठी विशेष तपास पथकाची नेमणूक करावी, अशी मागणी धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी केली आहे.
बारामती शहरालगत बारामती ग्रामीण नावाच्या अस्तित्वात नसलेल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुमारे 350 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला. या भ्रष्टाचाराच्या गंभीर प्रकरणाचा तपास करण्याकरिता बारामतीतील माहिती अधिकार कार्यकर्ते पोपट धवडे यांनी बारामती पंचायत समिती ते मंत्रालय असा आठ वर्षे प्रदीर्घ लढा दिला, अखेर सरकार बदलल्यानंतर त्यांच्या या लढ्याला यश आले आहे. धवडे यांच्या मते, बारामती ग्रामीण या अस्तित्वात नसलेल्या ग्रामपंचायतीमध्ये घरकुलांचे वाटप, तसेच वेगवेगळ्या विकासकामे झालीच नसून केवळ निधी लाटण्यासाठी ग्रामपंचायतीची कागदोपत्री स्थापना केली गेली होती. इतर मागास वर्ग, भटक्‍या विमुक्त जमाती वस्त्या तसेच सातववस्ती, देशमुखवस्ती, समर्थनगर, ढवाणवस्ती इत्यादी वस्त्यांचा दलित वस्तीच्या यादीत समावेश करून सुधारणा प्रस्ताव पाठवले, त्यापैकी अकरा दलित वस्त्या सुधारणा मंजूर करून प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात निधी हडप केला गेला. तसेच 250 मंजूर घरकुले उभारली गेली नाहीत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या सर्व प्रकरणाला खतपाणी घालणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेच्या संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)