बारामतीत बंद नावालाच; वोट बॅंक सांभाळण्यावर भर

बारामती- पेट्रोल व डिझेल दरवाढीविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला बारामती शहरात कामी तर ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला. शहारातील ठराविक दुकाने काही काळ बंद होती. त्यामुळे बारामतीचे जनजीवन दिवसभरासाठी सुरळीत सुरू होते. बंदमध्ये राष्ट्रवादी पूर्ण ताकतिनीशी उतरेल अशी घोषणा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बारामती येथे केली होती. मात्र, व्यापाऱ्यांच्या तीव्र भावना लक्षात घेत नाराजी पत्करायला नको, म्हणून राजकीय पक्षांनीही कोणावरही बंदसाठी दबाव न आणल्याने शहरात बंद शांततेत पार पडला.
सातत्याने दररोज पेट्रोल व डिझेल दरवाढ होतच आहे. सरकार याचा गांभीर्याने विचार करत नसून जनतेची आर्थिक लुटच करत आहे. तरी ही अन्यायकारक दरवाढ कमी करावी याकरिता बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करून बारामती तहसीलदार हनुमंत पाटील यांना दरवाढीबाबतचे निवेदन प्रशासकीय भवनात देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, पंचायत समिती सभापती संजय भोसले, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष ऍड. राजेंद्र काटे, दूध संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र रायकर, उपसभापती शारदा खराडे, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, आज सोमवारचा दिवस असल्याने व दोन दिवसांची सलग सुट्टी झाल्याने आज अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद न ठेवण्याचे ठरविले. दुसरीकडे काहींनी धोका पत्करायला नको म्हणून दुकाने बंद ठेवली, त्यामुळे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील एसटी सेवा आज सुरळीत सुरु होती, कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. शहरातील सर्व अत्यावश्‍यक सेवा सुरळीत सुरु होत्या.

  • भिगवण चौकात मनसेची घोषणाबाजी
    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरातील भिगवण चौकात पेट्रोल व डिझेल दरवाढी विरोधान निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पेट्रोल-डिझेल दरवाढ तसेचे महागाईच्या विरोधात मनसे कर्येकर्त्यांनी यावेळी सरकारवर हल्लाबोल चढवला. मनसेचे जिल्हाध्यक्ष ऍड. विनोद जावळे यांनी रविवारी (दि. 9) सायंकाळी तसेच आज सकाळी सायकल चालवत पेट्रोलपंपावर गांधीगीरी केली. प्रदेश उपाध्यक्ष ऍड. सुधीर पाटसकर, तालुकाध्यक्ष ऍड. निलेश वाबळे, ऍड. मेघराज नालंदे, ऍड. बिलाल बागवान, मंगेश गिरमे, पप्पु तावरे, प्रदिप शिंदे यांच्यासमवेत मनसे कर्यकर्त्यांनी यावेळी चौकात गर्दी केली होती.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)