बारामतीत प्रशासकीय भवन असुरक्षित

अग्निशमन यंत्रणाच नाही : सुरक्षेबाबत कोणालाही सोयरेसुतकच नाही

जळोची – प्रशासकीय भवन इमारतीत आग विझविण्यासाठीची पुरेशी साधने उपलब्ध नाहीत. सहा वर्षापूर्वी मंत्रालयला आग लागल्याच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने सर्व शासकीय कार्यालयाचे फायर ऑडिट, नव्हे कार्यालयामधील अग्निशमन यंत्रणा कार्यन्वित करा असे आदेश दिले. बारामतीतील प्रशासकीय भवनात अग्निविमोचक यंत्र (फायर एक्‍झटींगविश), वाळू व पाण्याने भरलेल्या बादल्याही आढळून आल्या नाही. डझनभर शासकीय कार्यालये असुरक्षित असल्याचे “प्रभात’च्या पाहणीतून आढळून आले.

बारामतीच्या प्रशासकीय भवनात तहसीलदार, उपविभागीय अधिकारी (प्रांत), दुयम निबंधक कार्यालय, तालुका भूमी अभिलेख, सहायक नगररचना, लेखा परीक्षण सहकारी संस्था, लघु पाटबंधारे, मंडळ कृषी अधिकारी,सामाजिक वनीकरण, निरीक्षण वैधमापन शास्त्र उत्पादन शुल्क, सार्वजनिक बांधकाम विभाग अशी विविध कार्यालये या इमारतीत अग्निसुरक्षेबाबत असुरक्षित असूनही उपविभागीय अधिकारी कार्यालय अनभिज्ञ असल्याचे नुकतेच समोर आले आहे.
तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालयाची रेकॉर्ड रूममध्ये अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नाही. प्रशासकीय भवन, कृषी भवन, अभियांत्रिकी भवन या तिन्ही इमारती अग्निशमन यंत्रणा शिवाय उभ्या राहिल्या आहेत. प्रशासकीय भवनातील कामकाज 2014 मध्ये सुरू झाले. सार्वजनिक बांधकाम विभागच्या विद्युत विभागाचे अनेक अधिकारी बदलून गेले, मात्र या इमारतीच्या सुरक्षेबाबत कोणालाही सोयरेसुतक नसल्याचे आढळून आले आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या सुरक्षेबाबत चालढकल करत असल्याचे त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. संबंधित अग्निशमन यंत्रणा कार्यन्वित करण्यासाठी कंट्रोल बोर्डचीच दुरवस्था झाली आहे.

प्रशासकीय भवनाच्या अग्निशमन सुरक्षेबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून घेण्यात येईल.
– हेमंत निकम, उपविभागीय अधिकारी

आमच्या विद्युत विभागाशी अनेक वेळा संपर्क करण्यात आला आहे. हे त्यांचे काम आहे.
– विश्‍वास ओव्हाळ, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)