बारामतीत पाच कृषी अधिकाऱ्यांवर गुन्हा

बारामती-सन 2015-16 या आर्थिक वर्षात बारामती तालुक्‍यातील जळगाव कडेपठार येथील नाला बांधकामाची निविदा भरता पदाचा गैरवापर करून थेट त्या कंपनीला स्वत:च्या फायद्यासाठी काम दिल्याप्रकरणी कृषी विभागातील पाच अधिकाऱ्यांविरूद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे शासकीय अधिकाजयांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद पर्वतराव परजणे (वय 60), बारामती तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार नारायण बरकडे (वय 50), बारामती मंडल कृषी अधिकारी पोपट शंकर ठोंबरे (वय 57), कृषी पर्यवेक्षक शाहुराज हरिश्‍चंद्र मोरे (वय 43), कृषी सहाय्यक विजय किसन चांदगुडे (वय 55) अशी गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्यांची नावे असून यामध्ये संतोषकुमार बरकडे, पोपट ठोंबरे, शाहुराज मोरे आणि विजयकुमार चांदगुडे यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबतची माहिती अशी की, जळगाव कडेपठार येथील नाला बांधकामासाठी खासदार निधी मंजूर झाला होता. या अधिकाऱ्यांनी अधिकाराचा गैरवापर करून पुर्वी दिलेल्या ठेकेदाराने मुदतीत काम पूर्ण केले नाही म्हणून ते काम मे. सिद्धांत कन्स्ट्रक्‍शन या कंपनीला निविदा भरली नसतानादेखील देण्यात आले. तसेच सिद्धांत कन्स्ट्रक्‍शनकडून अनामत रक्कम व अतिरिक्त सुरक्षा ठेव भरून घेणे आवश्‍यक असताना त्याची पूर्तता केली नाही. अशाप्रकारे या कृषि अधिकाऱ्यांनी आपल्या नियंत्रणात असलेल्या शासकीय रक्कमेचा व पदाचा दुरूपयोग करून सिद्धांत कन्स्ट्रक्‍शनचे शिवाजी एकनाथ भोंडवे यांना बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करून कामे दिली. याप्रकरणी प्राप्त तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाची चौकशी करून बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. दरम्यान या कारवाईमुळे शासकीय अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आपल्या पदाचा गैरवापर केल्याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)