बारामतीत पहिले पाढे पंच्चावन्न !

आता व्यावसायिक ठरताहेत वाहतूककोंडीला कारणीभूत : पार्किंगची व्यवस्था नाही
जळोची: बारामती शहरातील औद्योगिक व शहरीकरणांमुळे भविष्यात होणारी वाहतूककोंडी विचारात घेऊन शहरात अंतर्बाह्य मोठमोठ्या रस्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. निर्माण केलेल्या रस्त्यामुळे शहरात नित्याचीच होणारी वाहतूककोंडीची समस्या संपुष्टात आली.
औद्योगिकीकरणासाठी होणारी वाहतूक शहराच्या बाह्य रस्त्याने वळवली जात आहे. मात्र, शहरातील रस्त्यांवर असणाऱ्या हॉटेल्स, मॉल, लॉज, रेस्टॉरंट, बिअरबारमध्ये येणारे वाहनचालक रस्त्यातच वाहने पार्क करत असल्याने पुन्हा एकदा वाहतूककोंडी होऊन अपघात होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
शहराच्या विस्तारीकरणाबरोबरच नागरिकांची व वाहनांचीही संख्या प्रचंड वाढली आहे. मात्र, या वाढत्या वाहनांचा विचार करता तेवढ्या प्रमाणात शहरात पार्किंगची व्यवस्था नाही. त्यातच शहरातील रस्त्याच्या दुतर्फा उभारण्यात आलेले मोठमोठे हॉटेल्स, मॉल, लॉज, रेस्टॉरंट, बिअरबार मालकांनी पुरेशी पार्किंगची व्यवस्था केली नसल्याने वाहनचालक रहदारीच्या रस्त्यावरच वाहने अस्ताव्यस्त पार्क करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा येत असून वाहतूककोंडी होत आहे.
शहरातील रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या वाहनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, ही वाहने अपघाताला निमंत्रण देत आहेत. त्यामुळे भविष्यातील अपघात टाळण्यासाठी नगरपालिका प्रशासनांसह पोलीस प्रशासनाने या वाहनांवर कारवाई करणे गरजेचे आहे. कारभारी ते गुणवडी चौक या रस्त्यावर वाहनांसह चक्क हॉटेल व मद्याच्या दुकानाचे फलक ठेवल्याने वाहतुकीला अडथळा ठरत आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)