बारामतीत नगर पालिकेसमोर “मौन धारण’

बारामती- बारामती नगर पालिकेसमोर तालुका व शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त मौन धारण आंदोलन करण्यात आले.
केंद्र व राज्य सरकारने मनुवादी विचारांची पाठराखण करताना समस्थ भारतीयांच्या माथी पेट्रोल, डिझेल, व गॅस दरवाढ बोजा टाकला आहे. शेतकरी कर्जमाफी करणार, दोन कोटी तरूणांना रोजगार देणार, शेती मालाला दिडपट हमी भाव देणार, प्रत्येक नागरिकांच्या बॅंक खात्यावर 15 लाख रुपये जमा करणार, महीला अत्याचार कमी करणार, महागाई कमी करणार अशा अनेक घोषणा केल्या होत्या. उलट स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांत पहिल्यांदा संविधान वाचविण्यासाठी जनतेला रस्त्यावर उतरावे लागत आहे. शेतकरी, कामगार, कष्टकरी, शेतमजूर, नोकरदार, महीला, विद्यार्थी, व सामान्य जनतेसह सर्वच घटकांचे या सरकारच्या काळामध्ये आर्थिक कंबरडे मोडले असून जनता हवालदिल झाली आहे. मणून आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त महात्मा गांधीजींचे विचार पायदळी तुडवून मनुवादी विचारांचे उदात्तीकरण करणाऱ्या गांधीजींच्या तत्वा विरोधात देश व राज्य चालवणाऱ्या केंद्र व राज्य विरोधात महात्मा गांधी जयंती निमित्ताने बारामती तालुका व शहर राष्ट्रवादीच्या वतीने या सरकारचा जाहीर निषेध मौन धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच आंदोलनाच्या प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच हुतात्मा स्तंभास ही अभिवादन करण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहाराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, सभापती संजय भोसले, नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, गटनेते सचिन सातव, उपसभापती शारदा खराडे, ज्येष्ठ नेते सुभाष ढोले आदींसह सर्व संस्था, पक्ष संघटना, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती ग्रामपंचायत व महिला, युवक विद्यार्थी आणि राष्ट्रवादी प्रेमी कार्यकर्ते व आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)