बारामतीत टवाळखोरांना पोलिसांकडून “प्रसाद’

भवनीनगर- बारामती शहरातील शाळा-महाविद्यालयांबाहेर टवाळखोरी करणाऱ्यांसह रोडरोमिओंना पोलिसांनी प्रसाद देत त्यांना समज देण्यात आली. यावेळी ट्रीपलसीट, विनापरवाना वाहनधारकांवरही पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. तीन दिवसांत 120 विद्यार्थ्यांवर कारवाई करीत 32 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. दंड कारवाई करीत वाहनधारकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला.
आकांक्षा दरेकर हिच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी बारामतीतील सर्वच शैक्षणिक संस्थांवर लक्ष केंद्रीत केले आहे. वाहन चालविण्याचा परवाना नसता दुचाकी महाविद्यालयात तसेच शाळेत आणणे, एकाच वाहनावरुन तिघांनी जाणे, वेगाने गाडी चालविणे, या प्रकारांबद्दल पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. गेल्या तीन दिवसांत विद्या प्रतिष्ठान, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, म. ए. सो. विद्यालयासह काही शाळांबाहेर पोलिसांनी जोरदार कारवाई केली. तसेच काही ठिकाणी रोमिओंना पोलिसांचा चांगलाच प्रसादही मिळाला. दरम्यान काहीही काम नसताना शाळा महाविद्यालयांच्या परिसरात घुटमळणारे युवक पोलिसांच्या कारवाईच्या केंद्रस्थानी असून अनेक युवकांच्या पालकांना पोलिसांनी बोलावून त्यांना योग्य ती समज देण्यात आली.
दाम्यान, ज्या मुलींना कोणतीही मुले कशाही स्वरुपात त्रास देत असतील त्यांनी पोलिसांकडे न घाबरता तक्रार करावी, महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा प्राध्यापकांकडेही याबाबत तक्रार केल्यास पोलीस तातडीने कारवाई करतील, असे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर तसेच पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले. निर्भया व दामिनी पथकातील महिला पोलिस कर्मचाऱ्यांकडेही मुली तक्रारी करु शकतात, असे ही त्यांनी नमूद केले.

  • पालकांचे लक्ष महत्त्वाचे
    शाळा, महाविद्यालयात गेल्यावर आपले पाल्य काय करतात याकडे पालकांनी लक्ष द्यावे तसेच तो किंवा तिचे मित्र-मैत्रीणी कोणत आहेत. याबाबत पालकांनी माहिती घेणे अपेक्षीत आहे.ते कोणत्या वाईट संगतीला लागत तर नाही ना याची पालकांनी शाळा-महाविद्यालयात येऊन पाहणी करावी शाळेतील शिक्षकांशी महिन्यांतून किमान एक दोनदा भेट घेऊन पाल्याबाबत चौकशी करावी. तसेच अनेकदा मुली स्कार्फ बांधून दुचाकीवरुन जातात तेव्हा त्यांच्या पालकांनाही ही मुलगी आपली आहे हे ओळखू येत नाही. शहर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी सहा अल्पवयीन मुलींना मुलांसोबत फिरताना पकडून पोलीस ठाण्यात आणले, तेव्हा पालकांनाही आपली मुलगी काय करते आहे याचा तपासच नव्हता हे सिद्ध झाले. त्यामुळे मुले-मुली कोठे जातात, काय करतात, याची व्यवस्थित माहिती पालकांनी ठेवावी असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.
  • सीसीटीव्ही कॅमेरे अत्यावश्‍यक
    सर्वच शैक्षणिक संकुलात फिरुन पोलीस सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का, असतील तर ते व्यवस्थित आहेत का याचीही माहिती संकलित करीत आहेत. तसेच काही नवीन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेण्याच्या सूचनाही पोलिस अधिकाऱ्यांनी केल्या आहेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)