बारामतीत एक दिवसीय ठिय्या आंदोलन

जळोची – बारामती शहरात गेल्या 15 वर्षांपासून अनेक प्रश्‍न प्रलंबीत आहे. नगरपालिका प्रशासन व सत्ताधारी या कामांकडे दुर्लक्ष करित असून सर्व सामान्यनागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने बारामतीत आज (गुरुवारी) लोकतांत्रिक जनता दल यांच्या वतीने एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले. बारामती शहरातील इंदापूर रोड, प्रतिभानगर, सुहासनगर, वडकेनगर, साठेनगर, प्रबुद्धनगर आदी ठिकाणांवरील 1995 व 2000 मधील घरे नियमित करावी. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीचे काम गेल्या एक वर्षापासून प्रलंबित आहे. शहरातील गट नं 12 व 15 मधील प्रतिभानगर, सुहासनगर इंदापूर रोड, या ठिकाणची जागा नरवीर उमाजी नाईक हौसिंग सोसायटी, संत गाडगे महाराज हौ.सो.साठी दिलेली असून याची नोंद सीटी सर्व्हेला करावी, त्याठिकाणी असणाऱ्या रहिवाशांना पक्‍क्‍या बांधकामास परवानगी घावी, शहरातील नागरिकांनी प्रधानमंत्री आवास योजनेचे अर्ज डागडुजी करण्यासाठी भरलेले आहेत. त्यांची लवकरात लवकर दखल घेऊन अंमलबजावणी करावी, आदी मागण्यांसाठी हे ठिय्या आंदोलन करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)