बारामतीत अतिक्रमण काढताना दुजाभाव

  • दोन दिवसापासून कारवाईचा फार्स ः अनधिकृत बांधकामावर कारवाई कधी होणार

बारामती – बारामती नगरपरिषेद प्रशासनाने शहारात गेल्या दोन दिवसांपासून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. शहारातील रस्त्याच्या कडेला तसेच फुटपाथवर झालेली अतिक्रमणे पोलीस फौजफाट्यासह काढण्यात आली. मात्र, कारवाईदरम्यान दुजाभाव होत आसल्याचे काही व्यावसायिकांनी बोलून दाखवले. धनदांडगे तसेच राजकीय पुढाऱ्यांच्या अतिक्रमणे काढताना नगरपालिका प्रशासनाचे हात थरथरत आहेत, त्यामुळे आतिक्रमण कारवाईचा केवळ फार्स होत आसल्याचे खुद्द राष्ट्रवादीच्याच काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले. शहारात किरकोळ स्वरूपाची अतिक्रमण कारवाई वारंवार होत आहे, मात्र अनधिकृतपणे बांधकामे करून केलेले आतिक्रमण हटवण्याचे आव्हान नगरपालिका प्रशासनासमोर कायम आहे.
बारामती शहरात दोन दिवसांपासून अतिक्रमणविरोधी मोहीम राबवली जात आहे. प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार हनुमंत पाटील, मुख्याधिकारी मंगेश चितळे या मोहिमेत सहभागी होते. पोलीस निरीक्षक विजय जाधव तसेच ग्रामीणचे सुरेशसिंह गौड हे पोलीस फौजफाट्यासह उपस्थित होते. नगरपालिकेचे बांधकाम आभियंता जीवन केंजळे, रत्नरंजन गायकवाड, आर. पी. शहा, अतिक्रमण विभागाचे सुनील धुमाळ, आरोग्य आधिकारी सुभाष नारखेडे, राजेंद्र सोनवणे, अजय लालबिगे तसेच अतिक्रमण विभाग आणि आरोग्य विभागाच्या कार्मचाऱ्यांनी ही अतिक्रमणे हटविली. शहारातील भिगवण चौक, कचेरी रोड, गांधी चौक मेन रोड, इंदापूर रोड, गणेश भाजी मंडईसमोर, गुणवडी चौक ते चैत्राली हॉटेल, तसेच सिनेमा रस्त्यालगत, फुटपाथवर व्यावसायिक तसेच फेरीवाले, टपरीधारक यांनी केलेली अतिक्रमणे काढण्यात आली. यामध्ये फ्लेक्‍स, चहा-नाष्ट्यांची दुकाने, चायनिज पदार्थांच्या हातगाड्या काढण्यात आल्या. अपवादात्मक ठिकाणे वगळता कारवाईस फारसा विरोध झाला नाही. भाजी मंडई इमारातीचे काम सुरू असल्याने विक्रेत्यांना रस्त्यालगत विक्री करावी लागत असल्याचे काही विक्रेत्यांनी प्रांताधिकारी यांच्या निदर्शनास आणले. मात्र, कारवाई सुरूच राहिली. ठोस कारवाई करत प्रभावीपणे अतिक्रमण विरोधी मोहीम राबवून देखील काही ठिकाणची आतिक्रमणे “जैसे थे’ राहिली. त्यामुळे अतिक्रमणे काढण्यात नगरपालिका दुजाभाव करीत आसल्याचे काही व्यावसायिकांनी बोलून दाखवले.

अतिक्रमण विरोधी कारवाई करताना कोणताही भेदभाव करता कायद्यानुसार योग्य कारवाई केली जाईल. अतिक्रमणविरोधी करवाई यापुढेही सुरूच राहील. पुढील टप्प्यात बेकायदा केलेली पक्की बांधकामे तसेच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे.
-मंगेश चितळे , मुख्याधिकारी बारामती नगरपरिषद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)