बारामतीत अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन

बारामती-प्रभाग क्र. 19 गुणवडी रोड, देवळे इस्टेट येथील अंतर्गत रस्त्यांचे भूमिपजून शहराचे नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्थानिक नगरसेविका व आरोग्य समितीच्या सभापती तरन्नुम आल्ताफ सय्यद तसेच नवनाथ बल्लाळ, अनिता जगताप यांच्या विशेष प्रयत्नाने या भागातील गावडे हॉस्पीटल समोरील मुख्य रस्ता तसेच अंतर्गत चार रस्त्यांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. सदरील सर्व रस्त्यांचे किंमत चाळीस लाख रूपये असल्याची माहिती सय्यद यांनी यावेळी दिली. या प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगरसेवक कुंदन लालबिगे, संतोष जगताप, सत्यव्रत काळे, गणेष सोनवणे, सूरज सातव, सुधीर पानसरे, मुस्लिम बॅंकेचे संचालक अल्ताफ सय्यद, सिद्धनाथ भोकरे, दीपक गायकवाड, बबलु जगताप, शिक्षण मंडळाचे माजी सभापती हाजी कमरूद्दीन सय्यद, डॉ. पांडुरंग गावडे, अकलाक बागवान, महेश पटेल, हाजी चांद कुरेशी, अमिर शेख, सम्मद खान, जमीर बागवान, श्री. सावंत, ऍड. पिसे, नौशाद तांबोळी, श्री. भोई, कॉन्ट्रॅक्‍टर अनिल देशमुख, श्री. किकले तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेली अनेक वर्षांपासून रखडलेले हे काम सुरू झाल्याने या भागातील सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त करून स्थानिक नगरसेवकांचे आभार व्यक्त केले व आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत मुस्लिम बॅंकेचे संचालक अल्ताफ सय्यद यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)