बारामतीतील महिला रुग्णालयास खुर्च्या भेट

बारामती- बारामती येथील शासकीय महिला रुग्णालयास योगेशभैय्या जगताप मित्र मंडळाच्या वतीने 75 हजार रुपये किंमतीच्या 45 स्टीलच्या वेटींग खुर्च्या देण्यात आल्या. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने बारामती शहरात अत्याधुनिक शासकीय महिला हॉस्पीटल कार्यरत आहे. महिलांच्या आरोग्याची काळजी या हॉस्पीटलमध्ये घेतली जाते. त्यमुळे या हॉस्पीटलमध्ये शहर तसेच तालुक्‍यातील महिलांची कायम वर्दळ असते मात्र, रुग्णालयात वेंटींग खुर्च्या कमी असल्याने महिलांना तटकळत उभे राहावे लागते. ही बाब वैद्यकीय अधीक्षक बापू भोई यांनी लक्षात आणून दिल्यानंतर योगेशभैया जगताप मित्र मंडळाच्यावतीने 75 हजार रुपये किंमतीच्या 45 खुर्च्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते रुग्णालयास भेट देण्यात आल्या. याप्रसंगी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष जय पाटील, वैशाली नागवडे, गटनेते सचिन सातव, पंचायत समितीच्या उपसभापती शारदा खराडे, माजी सभापती करन खलाटे, जिल्हा परिषद सदस्य भारत खैरे, नगरसेवक सुरज सातव , नवनाथ बल्लाळ, अमर धुमाळ, संतोष जगताप, मयूर लालबीगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. योगेशभैय्या जगताप मित्र मंडळाच्यावतीने अनेक सामाजिक उपक्रमांचे आअयोजन केले जाते. येथून पुढील काळातही सामाजिक कार्यात मित्र मंडळ योगदान देईल. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांना अभिप्रेत असलेल्या कामासाठी वाटचाल असेल, असे मत माजी नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी व्यक्‍त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)