बारामतीतील मंडईत गुंडांची हप्तेखोरी

आठवड्या बाजारात माल घेऊन आल्यास मंडई जागा मिळत नाही, रस्त्यावर बसल्यास गावगुंड वर्गणीच्या नावाखाली त्रास देतात. शेतकऱ्यांना स्थानिक व्यापारी शिवीगाळ करून बसू देत नाही. हे थांबले पाहिजे.
– साधनाबाई कुचेकर, शेतकरी

दादागिरीला कंटाळून शेतकऱ्यांनी रस्त्यावर थाटले दुकाने : दुहेरी कराचा शेतकऱ्यांना भुर्दंड

जळोची – शहराची वाढती लोकसंख्या, भाजी मंडईमधील सुविधांवर पडणारा ताण, निर्माण होणाऱ्या समस्या या सर्व बाबतीत विकासात्मक निर्णय घेऊन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोट्यवधी रुपये खर्च करुन बारामतीत सुज्ज अशी मंडई बांधण्यात आली. मात्र, व्यापारी ओटे धारक शेतकऱ्यांना मंडई आवारात बसण्यास मज्जाव करत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या दादागिरीला कंटाळून शेतकरी रस्त्यावर आला आहे. येथे व्यापारी गुंडांना हप्ता पावती व नगरपालिकेला कर द्यावाच लागतो, त्यामुळे गावातील बाजार परवडतो अशी भावना शेतकरी सीताराम कोकरे यांनी “प्रभात वॉच’मध्ये व्यक्‍त केली.

जिल्ह्यात नव्हे राज्यात अतिशय सुसज्ज अशी वास्तू निर्माण झाली. मात्र बारामतीच्या आठवडा बाजारात शेतकऱ्यांना मंडई आवारात बसू देत नाही. आम्ही रस्त्यावर बसलो तर येथील व्यापाऱ्यांचे नातेवाईक गुंड विविध कारणे सांगून पैसे घेतात. पैसे न दिल्यास मालावर माती टाकून पळून जातात. तक्रार केली तर पोलिसांचा त्रास होईल या भीतीपोटी तक्रार करत नाही. एकाच व्यापाऱ्यांचे तीन व चार दुकाने आहेत. घरातील दोन-चार व्यक्‍ती बसवून आम्हां शेतकऱ्यांना बसू दिले जात नाही. आम्हाला माल द्या अन्यथा बघतो कोण वाचवितो अशी धमकी आम्हाला दिली जाते. पुढील आठवड्यापासून दुसरीकडे माल नेणार मात्र, बारामतीत येणार नाही अशी भावना शेतकरी हरिदास जाधव यांनी व्यक्‍त केली.

माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते मंडईचे उद्‌घाटन करण्यात आले होते. मात्र, कोटी रुपये खर्च करुन सुद्धा मंडई थेट रस्त्यावर असल्याचे चित्र सध्या बारामतीत दिसत आहे. रस्त्यावरतीच दुकाने मांडल्याने नागरिकांना नाहक त्रासाला समोरे जावे लागत असल्याचे नागरिक सांगतात. शेतकऱ्यांना कोणत्याही सुविधा मिळत नाही. मंडईमध्ये व्यापारी दादागिरी करत असल्यामुळे शेतकरी आत जात नाही. गेल्या काही दिवसांपासून मुख्य रस्त्यावरच भाजी विक्रेत्यांनी आपली दुकाने मांडली आहेत. अस्ताव्यस्त बैठक व्यवस्थेमुळे बकालपणा असून, अनेक समस्येच्या गर्तेत भाजी मंडई आहे. मुख्य रस्त्यावर भाजीपालाविक्रेते बसत असल्याने ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करून, तर रस्त्यावर वाहतुकीकडे दुर्लक्ष करत चालत जाऊन भाजीपाला घेतात. त्यामुळे रस्त्यावर अनेकदा वाहतूक- कोंडी निर्माण होत असते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)