बारामतीतील बांधकाम मजुरांची उद्यापासून नोंदणी

ही कागदपत्रे आवश्‍यक…

बांधकाम मजुरांना नोंदणीसाठी नोंदणी अर्ज, पासपोर्ट आकारातील 4 फोटो, नगर पालिका शहर अभियंतांचे बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र, ग्रामपंचायत/ग्रामसेवक यांचे बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र, नियुक्‍तीचे प्रमाणपत्र (90 दिवसांपेक्षा अधिक दिवस काम केल्याचा), आधार किंवा मतदान कार्ड, रेशन कार्ड झेरॉक्‍स, बॅंक पासबुक आदी कागदपत्रे लागणार आहेत.

जळोची – बारामती शहराची लोकसंख्या जशी वाढली. तशी मागील अनेक वर्षांपासून बांधकाम व्यवसायीकांची संख्यादेखील वाढली. पर्यायाने बांधकाम मजुरांची संख्याही वाढली आहे. मात्र या बांधकाम मजुरांची कोठेही नोंदणीच नसल्याने हे सर्व कामगार शासनाच्या कल्याणकारी मंडळाकडून मिळणाऱ्या अनेक लाभाच्या योजनांपासून वंचीत आहेत. यामुळेच बांधकाम व्यवसायीकांच्या क्रेडाई संघटनेने या बांधकाम मजुरांच्या नोंदणीसाठी पुढाकार घेतला आहे.

बारामती शहरातील कसबा भागातील क्रेडाई संघटनेच्या कार्यालयात शुक्रवारी (दि. 30) ही नोंदणी होणार आहे. यासाठी येताना फोटो, आधारकार्ड, निवास पुरावा, ज्यांच्याकडे काम केले त्यांचे 90 दिवसाचे प्रमाणपत्र, बॅंक खात्याचे पासबुक झेरॉक्‍स आदी कागदपत्र द्यावी लागणार आहेत. इमारतीच्य सुरवातीपासूनच खोदाई कामासह, सेंट्रींग कामगार, गवंडी, फरशी व इलेक्‍ट्रीकल फिटींग करणारे कामगार, पेंटर, सुतार कारागीर, फॉब्रीकेटर्ससह सर्वच बांधकामात सहभागी असणाऱ्यांना बअंधकाम मजुरांची नोंदणी करुन शासनाच्या कल्याणकारी मंडळाकडून मिळणाऱ्या सर्व योजनांचा लाभ घेता येणार आहे.

या नोंदणीकृत बांधकाम मजुरांना स्वत:साठी लागणारे साहीत्य घरेदीसाठी तीन वर्षातून एकदा 5 हजार, पहिल्या लग्नासाठी 30 हजार, पत्नीला दोन नैसर्गिक प्रसूतीसाठी 15 हजार, शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी 20 हजार, दोन मुलांना 1 ली ते 7 वीच्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी प्रत्येकी अडीच हजार, 8 वी ते 10 वीत शिक्षण घेणऱ्यांना प्रतीवर्षी 5 हजार, 11 वी व 12 वीत शिकाणाऱ्या मुलांना प्रतीवर्षी 10 हजार, पदविका अभ्यासक्रमासाठी 20 हजार, अभियांत्रिकी पदवीसाठी 60 हजार, वैद्यकीय पदवीसाठी 1 लाख, एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे 18 वर्षांपर्यंत प्रत्येकी 1 लाखांची मुदत बंद ठेव, कुटुंबाच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी 1 लाख, व्यसनमुक्ती केंद्रांतर्गत उपचारासाठी 6 हजार, अंपगत्व आल्यास 2 लाख रुपये, अंत्यविधीसाठी 10 हजार, मृत्यू झाल्यास विधवा पत्नीला 24 हजार, मजुराचा कामावर मृत्यू झाल्यास 5 लाख रुपयांची मदत शासनाकडून मिळणार आहे. आजच आपल्या कॉन्ट्रॅक्‍टरकडे किंवा इंजिनिअरकडे नोंदणीसाठी लागणाऱ्या 90 दिवस काम केलेल्या कामावर नियुक्‍तीच्या दाखल्यासाठी आग्रह धरण्याचे आवाहन क्रेडाईचे राज्य सहसचिव प्रफुल्ल तावरे व बारामती क्रेडाईचे अध्यक्ष दिपक काटे यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)