बारामतीतील ठिय्या आंदोलना उत्स्फुर्त प्रतिसाद

बारामती- मराठा आरक्षणासाठी बारामतीत सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनामध्ये आज महिलांनी शासकीय वाहनांची प्रतिकात्मक पूजा करुन अनोख्या पद्धतीने शासनाचा निषेध नोंदविला. ठिय्या आंदोलनाच्या आज (शनिवारी) तिसऱ्या दिवशी बारामती तालुक्‍याच्या विविध भागातून मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भारुड सम्राट शिवाजी काळे यांनी भारुड सादर केले.
आज तालुक्‍यातील फलटण रस्ता परिसरातील सांगवी, शिरवली, खांडज, गवारे फाटा, मळद, बारामती ग्रामीण, पाहुणेवाडी, माळेगाव कारखाना, घोरपडे वस्ती, कांबळेश्वर, शिरष्णे, पिंपळवाडी, पंधारवाडी आदी भागातून मराठा बांधव ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते. याप्रसंगी महिलांची संख्या लक्षणीय होती. दरम्यान, आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या समाज बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली.तसेच दुपारच्या सत्रात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस वाहनांचे मराठा समाजातील महिलांनी प्रतिकात्मक पूजन करुन आरक्षण देण्यात शासनाकडून दिरंगाई होत असल्याचा निषेध नोंदविला. यावेळी छोट्या गटातील आराध्या गायकवाड हिने आरक्षण का हवे या विषयावर भाषण सादर केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)