बारामतीतील ठिय्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

बारामती- मराठा आरक्षण मिळावे व इतर मागण्यांसाठी मराठा समाजाने सुरू केलेले ठिय्या आंदोलनमध्ये सोमवारी (दि. 6) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला बारामती नगरपरिषदच्या शेजारी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलन वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
यावेळी आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या समाज बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मेखळी येथील आप्पा महाराज सूर्यवंशी यांचे कीर्तन व
समाजप्रोबधनकार व कीर्तनकार भारुड सम्राट शिवाजी शेळके यांचा भारुडचा कार्यक्रम सादर करण्यात आला.
याप्रसंगी तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. सकाळी 10 ते सांयकाळी 5 च्या दरम्यान ठिय्या आंदोलनामध्ये नीरा रस्त्यावरील माळेगाव, पणदरे, कोराळे, वडगांव, वाघळवाडी, सोमेश्‍वर, लाटे, कांबळेश्‍वर, शारदानगर, धाकटे माळेगाव, होळ, मानापावस्ती, धुमालवाडी व इतर सर्व गावातील सर्व मराठा समाज बांधवांनी सहभाग घेतला. मंगळवारी (दि. 7) पाटस रस्ता व भिगवण रस्ता येथील समाज बांधव ठिय्या आंदोलनमध्ये सहभागी होणार आहे तरी मोठया प्रमाणावर बारामती शहर व तालुक्‍यातील मराठा समाज बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा बारामती शाखा याच्या वतीने करण्यात आले.

  • क्रांतीदिनी पवारांच्या निवस्थानसमोर ठिय्या
    बारामती तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा खासदार शरद पवार यांच्या शारदानगर येथील निवासस्थानच्या प्रवेशद्वारासमोर गुरुवारी (दि. 9) ठिय्या आंदोलन होणार आहे. क्रांतीदिनी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत हे ठिय्या आंदोलन होणार आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)