बारामतीतील कालव्यात मृतदेह आढळला

जळोची -बारामती शहरातील नीरा डावा कालव्यात आज (सोमवारी) दुपारी 25 ते 30 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला असून त्याचा खून करुन मृतदेह पाण्यात टाकल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी शुभम अहिवळे यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात खबर दिली. मृतदेहाच्या अंगावर निळ्या रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅंट आहे. डाव्या हाताच्या दंडावर अहल्यादेवी होळकर यांची प्रतिमा गोंदवलेली असून त्याच्या खाली धनगर राज असे शब्द गोंदलेले आहेत. त्यामुळे हा मृतदेह धनगर समाजाच्या तरुणाचा असल्याचे स्पष्ट होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. यासंबंधी कोणाला काही माहिती असल्यास बारामती शहर पोलीस ठाणे अथवा 02112-244333 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)