बारामतीच्या बागती भागात उसपिके जळाली

आवर्तन बंद, उन्हाची तीव्रतेचा फटका

सोमेश्‍वरनगर- मार्चच्या मध्यंतरातच उन्हाची वाढलेली प्रचंड तीव्रता आणि नीरा डावा कालव्याचे बंद झालेले आवर्तन यामुळे बारामती तालुक्‍याच्या बागायती भागातील उसाच्या पिकाला फटका बसू लागला आहे. आठवडाभरातच पिके पाण्याअभावी जळून जाऊ लागली आहेत. उन्हाळ्याचे आणखी दोन-अडीच महिने कसे जाणार या चिंतेने शेतकऱ्याला ग्रासले आहे.

बारामती तालुक्‍याच्या बागायती भागात ऊस हेच प्रमुख पीक घेतले जाते. नगदी पीक असल्याने त्यातून हक्काचे उत्पन्न मिळते, त्यामुळे शेतकरी ऊस पिकाकडे वळतो. शिवाय या भागात पाण्याची फारशी चिंता नसते. नीरा डावा कालवा, बंधारे यामुळे विहिरी, कूपनलिकेला बारमाही पाणी असते. कालव्याच्या आवर्तनाचाही फायदा होतो. शिवाय अन्य पिकांच्या तुलनेत उसाला रोग-किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. उसाचे क्षेत्र वाढण्यामागे ही कारणे आहेत. परंतु सध्या नीरा डावा कालव्याचे आवर्तन बंद झाले असल्याने व उन्हाची तीव्र वाढल्याने विहिरी, कुपनलिकांनी तळ गाठला असल्याने ऊस पिकाला पाणी देता येत नसल्याने पीक डोळ्यादेखत जळत पाहण्याविना शेतकऱ्यांना पर्याय राहिलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)