बारामतीच्या पश्‍चिम भागात सरासरी 65 टक्‍के मतदान

मुर्टी- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आज तिसऱ्या टप्प्यात बारामती तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यात कुठलाही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान पार पडले. पश्‍चिम भागात सरासरी 65 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मतदान झाले. पश्‍चिम भागतील गावांनुसार मतदानाची टक्‍केवारी पुढीलप्रमाणे; मोरगाव 65. 03, तरडोली 64.24, लोणी भापकर 61. 50, पळशी 69.91, मुर्टी येथे 69, आंबी 56.96, माळवाडी 74 टक्‍के मतदान झाले. सकाळी सात वाजल्यापासून मतदानासाठी महीला,तरुण वर्ग, पुरुषांनी रांगा लावल्या होत्या. मतदानाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पुणे जिल्हा मार्ग क्र 65 वरील मोरगाव, तरडोली या केंद्रांना भेट दिली. पाटील यांनी मोरगाव येथील मयुरेश्‍वर विद्यालयातील मतदान केंद्राबाहेर असणाऱ्या दुचाकी व चारचाकी गाड्या हलवण्याच्या पोलिसांना सूचना दिल्या. दरयान, तरडोली येथे गंगुबाई हंबीर भापकर (वय 101) तर संपत सखाराम भापकर (वय 103) या वृद्धांनीही आपला मतदानाच हक्‍क बजावला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)