बारामतीचा पश्‍चिम भाग गारठला

करंजे-बारामती तालुक्‍यात प्रामुख्याने पश्‍चिम भागातील वाणेवाडी, मुरूम, वाघळवाडी सोमेश्‍वरनगर परिसर, वाकी, चोपडज, वडगावमध्ये तीन ते चार दिवसांपासून थंडीने कहर केला आहे. त्यामुळे नागरिक सकाळी नऊच्या आधी घराबाहेर पडत नसल्याचे चित्र आहे.
बारामती तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात सरासरी 15 ते 16 अंश सेल्सिअस तापमान असते, मात्र, सध्या हे तापमान थेट 6 ते 7 अंशावर अल्याने सकाळी नऊ वाजेपर्यंत व सायंकाळी सहानंतर नागरिक शेकोटीभोवती बसून गप्पांचा फड रंगवत आहेत. वाढलेल्या थंडीमुळे हवेमध्ये गारवा तयार झाल्याने नागरिक घराबाहेर पडत नाहीत. या भागातील शाळा महाविद्यालय विद्यार्थ्यांची शनिवारची उपस्थिती 60 ते 65 टक्‍क्‍यांनी घटली होती. मोठ्या प्रमाणात परिणाम शेतातील विशेषतः हरबरा, कांदा, दुधी भोपळा या पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान सोमेश्वरनगर परिसरात यापूर्वीही मोठ्या प्रमाणात थंडी पडल्यामुळे बागायती क्षेत्रावर परिणाम झाला असून वेलवर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे .शासनाने याचा पंचनामा करून भरपाई देण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी सोमेश्वरनगर परिसरातील प्रगतशील शेतकरी संजय भानुदास सोरटे यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)