बायोमेट्रीक रेशनिंगमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम

जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची माहिती
कोल्हापूर – राज्यातील 51 हजार रेशिंग दुकानामध्ये पीओएस (पॉईट ऑफ सेल) मशिन्स बसविन्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. यामध्ये जिल्ह्यातील 1568 दुकानांमध्ये पीओएस मशिन्स बसवून त्याद्वारे व्यवहार सुरु झाले आहेत. राज्यात सुमारे साडेपाच लाख कार्डांवर व्यवहार झाले असून त्यांपैकी 2 लाख 55 हजार कार्डांवर जिल्ह्यात पीओएस मशिन्सद्वारे धान्य वितरण झाले आहे. बायोमेट्रीक रेशनिंग प्रणालीमध्ये इतक्‍या मोठ्या प्रमणात व्यवहार करुन कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात सर्वात जास्त आघाडी घेतली. हे यश कोल्हापूरवासीयांच्या उस्फुर्त सहभागामुळे साध्य झाले आहे. छत्रपती शाहू महाराजाच्या विचारांचा वारसा प्रत्यक्ष आचरणात आणणारा जिल्हा असून कोल्हापूरचा माणूस हा नवनवीन संकल्पना राबविण्यामध्ये उस्फुर्त सहभागी असतो असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले.
कोल्हापूर जिल्ह्याने 15 मे अखेर संपुर्ण राज्यात 2 लाख 55 हजारांहून अधिक कार्डांवर पीओएसद्वारे व्यवहार केले असून त्यावर साधारणत: 60 लाख किलो इतके धान्य वाटप केले आहे. राज्यात प्रचंड मोठ्या फरकाने जिल्हा अघाडीवर आहे. अनेक ठिकाणी रास्तभाव दुकानांसाठीचे धान्य अन्यत्र वळविल्याचे उदाहरणे समोर आली अशा बाबींना आळा घालण्यासाठी व पारदर्शी व्यवहारासाठी बायोमेट्रीक पध्दतीने धान्य वितरण करण्याचा शासनाने निर्णय घेण्यात आला. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने सर्वात मोठी आघाडी घेत प्रथम क्रमांक पटकावला. यामध्ये नागपूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकवर असला तरी कोल्हापूर जिल्ह्याची कामगिरी नागपूर जिल्ह्याच्या तीप्पट आहे. राज्यात 1 कोटी 60 लाख किलो धान्य वाटप झाले असून यापैकी 63 लाख किलो एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात झाले आहे. या बद्दल जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांच्यासह पुरवठा विभागाचे सर्व घटक, रास्तभाव दुकानदार, त्यांच्या संघटना यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)