बायोमेट्रीक पद्धतीने ओळख पटवूनच तूरडाळीचे वितरण

मुंबई: यापूर्वीच जाहीर झालेल्या शासन निर्णयानुसार स्वस्त धान्य दुकानात पुरवठा केलेली तूरडाळ शिधापत्रिकाधारकांना बायोमेट्रीक पद्धतीने ओळख पटवूनच रु. 35/- प्रति किलो या दराने विक्री करण्यात येत आहे. मुंबई आणि ठाणे शिधावाटप क्षेत्रांतर्गत येणाऱ्या दुकानांनी आतापर्यंत सुमारे 39 हजार 873 क्विंटल इतक्या तूरडाळीची मागणी नोंदविली आहे. त्यापैकी 2532 अधिकृत शिधावाटप दुकानांमध्ये 41.11 टक्के म्हणजेच 16 हजार 392.49 क्विंटल तूरडाळ आवक झलेली आहे.

आवक झालेल्या तूरडाळीपैकी 11 हजार 15.99 क्विंटल म्हणजेच 97.30 टक्के तूरडाळीची विक्री ऑनलाईन (E- POS) मशीनद्वारे आधार क्रमांक पडताळणी करुन बायोमेट्रिक प्रणालीद्वारे वितरीत करण्यात आलेली आहे. तर  305.02 क्विंटल तूरडाळ म्हणजे 2.70 टक्के तूर डाळ ऑफलाईन पावती देऊन वितरण केलेली आहे. अशी माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठामुंबई यांनी दिली आहे. वृत्तपत्रांमध्ये सातत्याने दिशाभूल करणारी आणि चुकीची माहिती देणारे वृत्त प्रकाशित होत आहे या पार्श्वभूमीवर याबाबतची सविस्तर माहिती एका पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)