बायोमेट्रीक दर्शनपास काउंटर दर्शन रांगेजवळ द्या

ग्रामस्थांचेकार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
दखल न घेतल्यास तीव्रआंदोलन करण्याचा इशारा

शिर्डी – साईबाबा संस्थाननेबायोमेट्रीक दर्शनपास काउंटर दर्शन रांगेजवळ सुरु करावे , या मागणीचे निवेदन शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांना देण्यात आले.

संस्थानने काही महिन्यांपासून दर्शन रांगेत जाण्यापूर्वी साईभक्‍तांना बायोमेट्रीक पास घेणेबंधनकारक केले आहे. हा बायोमेट्रिक दर्शनपास असल्याशिवाय रांगेत जाता येत नाही. हा पास वितरीत करणारे काउंटर श्रीराम पार्कींग व जुन्या प्रसादालय या ठिकाणी दर्शन रांगेपासून दूर अंतरावर आहे. या ठिकाणी भर उन्हात भक्‍तांना अनवाणी जावे लागते. तसेच जुन्या प्रसादालयाच्या इमारतीजवळ मोठेखड्डे पडले आहेत. यामुळे भक्‍तांना जाण्या- येण्यासाठी मोठ्या त्रासास सामोरे जावे लागते. हे लक्षात घेत साईबाबा संस्थानने जुने बायोमेट्रीक पास काउंटर तातडीने बंद करुन नव्याने काउंटर दर्शन रांगेजवळ सुरु करावे. याबाबत दखल न घेतल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला. निवेदनावर अशोक गोंदकर, मंगेश त्रिभुवन, ताराचंद कोते, सचिन कोते, अतुल गोंदकर, वैभव कोते, सचिन चौगुले, महेश लोढा यांच्या सह्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)