बायोपिकमध्ये संधी मिळाल्याने युविका चौधरी खूष

हल्ली एकापाठोपाठ एक बायोपिक बॉक्‍स ऑफिसवर रिलीज होत आहेत. असाच एक बायोपिक हरियाणातील सामाजिक कार्यकर्ताच्या जीवनावर आधारित असणार आहे. या बायोपिकमध्ये युविका चौधरीला महत्वाचा रोल मिळाला आहे. त्यामुळे सध्या ती भलतीच खूषीत आहे. “मै एस.पी. चौहान’ असे या बायोपिकचे नाव आहे. यामध्ये युविकाला सामाजिक कार्यकर्ता असलेल्या हिरोच्या पत्नीचा रोल करायचा आहे आणि या सामाजिक कार्यकर्त्याच्या रोलमध्ये असणार आहे जिमी शेरगिल.

सामाजिक कामामध्ये स्वतःला वाहून घेतलेल्या पतीला पत्नीकडून जो पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळते ते दर्शवण्याची संधी आपल्याला मिळाली आहे, असे युविकाने या निमित्ताने सांगितले. युविका चौधरीचे नाव सध्या तरी बॉलिवूडमध्ये अजिबात चर्चेत नव्हते. तिला यापूर्वी “लकिरे’मध्ये बघितले गेले होते. त्याशिवाय शाहरुख खानच्या “ओम शांति ओम’मध्येही तिच्या वाट्याला छोटासा रोल आला होता. पण अशा छोट्या छोट्या रोलमुळे बॉलिवूडमध्ये तिची ओळख निर्माण होत नाही, हे तिच्या लक्षात आले होते. त्यामुळेच एखाद्या बायोपिकमध्ये काम करण्याची तिची पूर्वीपासूनची ईच्छा होती. तिच्या ईच्छेप्रमाणे तिला ही संधी आता मिळाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)