बायोकेमिकल रक्‍तचाचण्या

आजारी पडल्यानंतर डॉक्‍टरांचा सल्ला घेताना निदानासाठी डॉक्‍टर बायोकेमिकल रक्‍त चाचण्या सुचवितात. मधुमेहाचे निदान रक्‍तशर्करा (रक्‍तातील ग्लुकोज) तपासून होते. उपचार घेताना नियमितपणे रक्‍तशर्करा प्रमाण तपासावे लागते. यकृतदाह (हिपॅटायटिस) मध्ये लिव्हर फंक्‍शन टेस्ट तपासाव्या लागतात. या चाचणीत सिरम बिलिरुबिन तपासण्यात येतात.
किडनी विकारांचे निदान करण्यासाठी किडनी फंक्‍शन टेस्ट्‌स महत्त्वाच्या ठरतात. त्यात किडनी सिरम युरिया, सिरक्रिटिनिन या रक्‍तचाचण्या करतात. हृदयविकाराच्या निदानात सिरम सी.के.एम.बी., सिरम ट्रोपोनिन, सिरम होमोसिस्टिन इत्यादी चाचण्या उपयुक्‍त ठरतात.

प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी करताना चाळीशीनंतर दरवर्षी रक्‍त तपासण्या कराव्यात बायोकेमिकल रक्‍तचाचण्यांद्वारे शरीराच्या चयापचयातील सूक्ष्म बदलांचे प्रतिबिंब निदान व उपचार करताना उपयुक्‍त ठरतात. शस्त्रक्रियेपूर्वी सिरम इलेक्‍ट्रोलाइटस व रक्‍तशर्करा तपासतात. रक्‍त चाचण्यांसाठी फाईल जपून ठेवावी. प्रसूतीपूर्व तपासणीत रक्‍तचाचण्या महत्त्वाच्या ठरतात. अतिदक्षता कक्षातील रुग्णांचा उपचारास मिळणारा प्रतिसाद पाहण्यासाठी व उपचारांची दिशा ठरविण्यासाठी रक्‍तचाचण्या उपयुक्‍त ठरतात.

रक्‍तचाचण्या प्रमाणित लॅबोरेटरी, डायग्नोस्टिक सेंटरमध्ये करणे हितावह ठरते. आधुनिक वैद्यकशास्त्राच्या प्रगतीत बायोकेमिकल रक्‍तचाचण्यांद्वारे निदान हे मानवाला लाभलेले वरदानच आहे. वैद्यकीय संशोधनात रक्‍त चाचण्यांद्वारे निदान महत्त्वाची भूमिका पार पाडतात. शारीरिक क्‍लिनिकल तपासणीतील निष्कर्ष रक्‍त चाचण्यांद्वारे पडताळून पाहतात. आर्टेरियल ब्लड गॅसेस थायरॉइड फंक्‍शन टेस्टस हार्मोन्स व्हिटॅमिन्स व ट्यूमर मार्कर्स सिरम एन्झॉइमस इत्यादी रक्‍तचाचण्या उपलब्ध आहेत. वंध्यत्व तपासणी व उपाचारात सिरम इस्टोजेन, सिरम प्रोजेस्टेरॉन व सिरम टेर्स्टोस्टेरॉन इत्यादी चाचण्या महत्त्वाच्या ठरतात.

प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रमाणित लॅबोरेटरी, डायग्नोस्टिक सेंटरमध्ये मेडिकल बायोकेमिस्ट्री स्वतंत्र विभाग आहे. सध्या रक्त चाचण्यांद्वारे निदान करताना प्रेडिक्‍टिव्ह ठरतात. जेनेटिक विकारांना अत्याधुनिक रक्‍तचाचण्या रोग निदान करण्यासाठी उपलब्ध आहेत.

डॉ. सोमनाथ सलगर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)