बायचुंग भुतियाने केली राजकीय पक्षाची घोषणा

नवी दिल्ली – भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतियाने फुटबॉलमध्ये कारकीर्द गाजवल्यानंतर आता राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. भुतियाने राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. ‘हमरो सिक्कीम पार्टी’ असं त्याच्या पक्षाचं नाव आहे. सिक्कीमच्या समस्या दिल्लीपर्यंत पोहोचत नाहीत. युवकांची टीम बांधून सिक्कीमच्या विकासासाठी काम करु आणि भ्रष्टाचाराविरोधात लढा देऊ असं यावेळी त्याने म्हटलं.

२०१४ मध्ये बायचुंग भुतियाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडणूकही लढवली, पण निवडणुकीत अहलुवालीया यांनी त्याचा पराभव केला होता. फेब्रुवारीमध्ये त्याने तृणमूल काँग्रेस पक्षामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. शेवटी त्याने आता आपल्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)