बाभुळगावात चार हजार वृक्ष लागवड

रेडा- इंदापूर तालुक्‍यातील बाभुळगाव ग्रामस्थांनी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने संयुक्त विद्यमाने गावांतील वन विभागाच्या गट नंबर 290 मधील 46 हेक्‍टर क्षेत्रात 40 हजार झाडे पहिल्या टप्प्यांत लावण्याचा संकल्प केला आहे,पुणे जिल्हा परीषदेचे सदस्य अभिजित तांबिले व आदर्श सरपंच संजय देवकर यांच्या हस्ते वृक्ष लागवडीचा प्रारंभ करण्यांत आला.
शालेय विद्यार्थी ग्रामस्थ यांच्या वतीने बुधवारी (दि. 11) गावातून वृक्ष दिंडी काढण्यात आली. त्या दिंडीमधून “झाडे लावा झाडे जगवा’, “पाणी आडवा पाणी जिरवा’, “एकच लक्ष तेरा कोटी वृक्ष लागवड’ अशा घोषणा देत जनजागृती करण्यात आली. त्यानंतर गट नंबर 290 या जमिनीमध्ये जावून वेगवेगळ्या प्रकारची दोन हजार झाडे लावण्यात आली, त्या झाडामध्ये लिंब, करंज, शिसु, कांचन, आपटा, चिंच, वाळवा आदी जंगली रोपांचे पुणे जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले, बाभुळगाव गावचे आदर्श सरपंच संजय देवकर, वनसंरक्षक समितीचे अध्यक्ष भारत यादव, कमल विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. बी. पाडुळे, वनपाल पी. डी. चौधरी वनसंरक्षक एस. व्ही. बागल यांच्या हस्ते रोपण करण्यात आले. परिसरात झाडे मोठ्या प्रमाणात असतील तर पर्जन्यवृष्टी होऊ शकते,हे गणित नव्या पिढींने ओळखण्याची गरज आहे, व वातावरणातील समतोल साधण्यासाठी वृक्षांची कशी मदत होते, पर्जन्य व वृक्ष यांचा सहसंबंध,मानवी जीवनातील वृक्षांचे महत्त्व अशा विविध विषयांवर अभिजीत तांबिले यांनी मार्गदर्शन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)