बाबूजी मराठी मनामनांत रुजलेले स्वरतीर्थ

श्रीधर फडके : राजगुरूनगर येथे रंगला “बाबूजींची गाणी जीवनाची’

राजगुरुनगर- दुसऱ्या माणसांची कदर करणारी व्यक्‍ती आणि आपण देशाचे समाजाचे देणे आहोत ही भावना अखंड जपणाऱ्या बाबूजींनी तब्बल 45 वर्षे मराठी संगीतसृष्टी गाजवताना त्यांच्या सुरांनी शब्दांना सजवले. उत्तम गायक, संगीत दिग्दर्शक, भावगीत गायक, शास्त्रीय सुगम संगीतकार अशी त्यांची विविध रूपे महाराष्ट्राने अनुभवली. ते खऱ्या अर्थांने मराठी मनामनांत रुजलेलं स्वरतीर्थ होते, अशी भावना ज्येष्ठ संगीतकार आणि गायक श्रीधर फडके यांनी व्यक्‍ती केली.
हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टेपाटीलस्मृती व्याख्यानमालेत “बाबूजींची गाणी जीवनाची’ गाणी या विषयावर फडके बोलत होते. या प्रसंगी संस्थेचे संचालक बाळासाहेब सांडभोर, डॉ. रोहिणी राक्षे, ऍड. माणिक पाटोळे, अंकुश कोळेकर, उमेश आगरकर, प्राचार्य डॉ. एस.बी. पाटील, व्याख्यानमाला समितीच्या अध्यक्षा ऍड. राजमाला बुट्टेपाटील, उपप्राचार्य प्रा. जी. जी. गायकवाड, प्रबंधक कैलास पाचारणे, डॉ. संजय शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.
या व्याख्यानमालेत श्रीधर फडके यांची प्रकट मुलाखत प्रा. शिल्पा टाकळकर यांनी घेतली यावेळी फडके यांनी सांगितले की, संगीत क्षेत्रात बाबूजींचे नाव जोडले गेले ते गीतरामायण या त्यांनी गायिलेल्या संगीतरामकथेशी. ग. दि. माडगूळकर त्यांनी शब्धबद्ध केलेले व बाबूजींनी गायिलेल्या गीतरामायणाने मराठी मनावर आजही गारुड केले आहे. सुधीर फडके ज्या पद्धतीने जगले त्याचा स्पर्श त्यांच्या गाण्याला झाला आहे. उदात्त, उत्कट मूल्यांची कास धरून आणि सत्यतेची साथ न सोडता ते जगले. त्यांच्या गाण्यात दरवळणारा सुगंध हे त्याचेच प्रतीक आहे. बाबूजींनी गाण्याची चाल आकर्षक, गोड व प्रासादिक असावी यासाठी विशेष लक्ष दिले. प्रखर देशभक्‍तीच्या भूमिकेतूनही त्यांनी दादरा नगरहवेली या पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या भारतातील प्रदेशाची मुक्तता करण्यासाठी केलेल्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या कार्यक्रमात श्रीधर फडके यांना गायिका शिल्पा पुणतांबेकर व तबलजी तुषार आंग्रे यांनी साथ दिली.

  • बाबूजींच्या सुरेल आठवणींना उजाळा
    श्रीधर फडके यांनी बाबूजींची झाला महार पंढरीनाथ, जय शारदे, तोच चंद्रमा नभात, धुंदी कळ्यांना, सखी मंद झाल्या तारका, ज्योती कलश झलके, पराधीन आहे पूत्र मानवाचा, बलसागर भारत होवो, जाळीमंदी पिकली करवंद, बाई मी पतंग उडवीत होते अशी एकापेक्षा एक सरस आणि सुप्रसिद्ध गाणी सादर करून बाबूजींच्या सुरेल आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांनी स्वतः संगीतबद्ध केलेली फिटे अंधाराचे जाळे, देवाचिया द्वारी, ओंकार स्वरूपा अशी अनेक गाणीही सादर केली.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)