बाबा रामरहीमच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

प्रकरण उघडकीस आणणाऱ्या रामचंदर छत्रपती यांना अभिवादन

नगर – साधुत्वाची ढोंगबाजी करणाऱ्या बाबा गुरमित राम-रहीम महिलांचे शोषण करत असल्याचे दृष्कृत्य पत्रकारितेच्या माध्यमातून उघडकीस आणणारे पत्रकार रामचंदर छत्रपती यांना आपले प्राण गमवावे लागले असून, अशा निर्भिड पत्रकाराच्या स्मृतीस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रेस क्‍लब, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती व डाव्या चळवळीच्या समविचारी विविध संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. तसेच, ढोंगी बाबा गुरमित राम-रहीमच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करण्यात आली.

प्रेस क्‍लबचे अध्यक्ष मन्सूर शेख यांच्या वतीने या अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुधीर लंके, महेश देशपांडे, कैलास ढोले, सुभाष लांडे, बन्सी सातपुते, बहिरनाथ वाकळे, अशोक सब्बन, ऍड. कारभारी गवळी, रमेश देशपांडे, कैलास ढोले, संध्या मेढे, शाहीर कान्हू सुंबे, शंकर न्यालपेल्ली, ऍड. सुधीर टोकेकर, नीलिमा बंडेलू, भगवान राऊत, अरुण वाघमोडे, अण्णा नवथर, साजिद शेख, शब्बीर सय्यद, आमीर सय्यद, नवनाथ खराडे, सोमनाथ शेळके, ऍड. अरुण जाधव, मुकुंद भट, वाजिद शेख, धनेश कटारिया, अनिल शहा, राजेश सटाणकर, उमेर सय्यद, रोहित वाळके, आदी उपस्थित होते.
महेश देशपांडे म्हणाले की, साधुगिरीच्या नावाखाली भोंदूगिरीचा नंगानाच करणारे गुरमितसारखे बाबा समाजाला कलंक आहेत. त्यांच्या काळ्या कृत्याला उघडकीस आणण्याचे धाडस रामचंदरसारख्या पत्रकाराने दाखविले. त्यांच्या शौर्यास पत्रकारांचा त्रिवार सलाम असल्याची भावना त्यांनी व्यक्‍त केली. बहिरनाथ वाकळे यांनी भाजप व संघानी निवडणुकीसाठी बाबा गुरमितशी तडजोड केली असल्याचे उघडकीस येत आहे. मताचे पाठबळ बाबांनी दिले तर त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची चर्चा झाल्याचे राम-रहीम यांची मुलगी सांगत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी अनेक उपस्थितांची भाषणे झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)