बाबा रामरहिमचा उत्तराधिकारी कोण ? या तीन नावांवर सुरू आहे चर्चा

चंदीगड – बाबा गुरमीत रामरहिम याला 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्याच्या डेरा सच्चा सौदा या पंथाचा पुढील कारभार कोण हाकणार याविषयी आता चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात तीन नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. त्यात त्याचा मुलगा जसमीत, दत्तक कन्या हनीप्रीत आणि डेराचे अध्यक्ष विपश्‍यना इन्सान यांच्या नावांचा समावेश आहे.

तथापी यावर कोणतेही भाष्य करण्यास डेराच्या व्यवस्थापनाने नकार दिला आहे. आमचे प्रथम प्राधान्य बाबा राम रहिम याच्या शिक्षेला हायकोर्टात आव्हान देणे हे आहे असे त्यांनी सांगितले.
कालच बाबाला दोन महिला भक्तांवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून दहा-दहा वर्षांची अशी एकूण 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे आणि त्याला ही शिक्षा स्वतंत्रपणे भोगायची आहे. त्यामुळे त्याच्या उत्तराधिकाऱ्याचा आता शोध सुरू करण्यात आला आहे.

बाबाचा जसमीत नावाचा मुलगा तिशीत असून तो विवाहित आहे. पंजाबातील कॉंग्रेसचे नेते हरमिंदर सिंग जस्सी यांच्या मुलीशी त्याचे लग्न झाले आहे. तथापी त्याची या डेराच्या प्रमुख पदावर निवड झाली तर ती डेराच्या प्रथेच्या विरोधात होईल कारण विद्यमान डेरा प्रमुखाच्या कुटुंबातील कोणाचीही त्याचा उत्तराधिकारी म्हणून निवड केली जात नाही. डेराच्या सर्व कारभाराचे व्यवस्थापन सध्या विपश्‍यना इन्सान यांच्याकडे आहे. त्यांना ही उत्तराधिकारी म्हणून काम करण्याची संधी आहे. तथापी त्यांनी स्वता मात्र गुरूजीच आमचे प्रमुख आहेत त्यांचा उत्तराधिकारी नेमला जाण्याची शक्‍यता नाही असे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)