बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण, कोल्हे दाम्पत्याला पद्मश्री

4 पद्मविभूषण, 14 पद्मभूषण आणि 94 पद्मश्री पुरस्काराचे मानकरी

नवी दिल्ली  – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह तीजन बाई, इस्माईल ओमर आणि अनिल कुमार नाईक यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पद्म पुरस्कारांमध्ये 4 पद्मविभूषण, 14 पद्मभूषण आणि 94 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पद्म पुरस्कारांमध्ये 21 महिलांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातून उद्योजक अनिलकुमार नाईक आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा “पद्मविभूषण’ने गौरव होणार आहे. लातूरमधील डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण बहाल करण्यात येणार आहे. मेळघाटात आदिवासी सामाजिक कार्यकर्ते स्मिता आणि रवींद्र कोल्हे अर्थात कोल्हे दाम्पत्याचा पद्मश्रीने गौरव करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नाटककार वामन केंद्रे यांचाही पद्मश्रीने सन्मान होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रसिद्ध चित्रपट अभिनेते मनोज वाजपेयी, पार्श्वगायक शंकर महादेवन, दिग्गज अभिनेते दिनयार कॉंट्रॅक्‍टर यांनाही पद्मश्री जाहीर झाला आहे. ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांनाही मरणोत्तर पद्मश्री प्रदान करण्यात येणार आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी सुदाम काते, शास्त्रज्ञ रोहिणी गोडबोले, सामाजिक कार्यकर्ते शब्बीर सय्यद, राजकीय विश्‍लेषक नगीनदास संघवी यांचाही पद्मश्रीने सन्मान होणार आहे. फूटबॉलपटू सुनिल छेत्री, क्रिकेटपटू गौतम गंभीर, कबड्डीपटू अजय ठाकूर यांचाही पद्मश्रीने गौरव होणार आहे. तर नृत्य दिग्दर्शक प्रभूदेवा, तालवादक शिवमणी यांनाही पद्मश्री जाहीर झाला आहे.

पद्मविभूषण
1. अनिलकुमार नाईक – उद्योग
2. बाबासाहेब पुरंदरे – कला
3. तीजन बाई – कला
4. इस्माईल ओमर – (परदेशी नागरिक)

पद्मभूषण
1. डॉ. अशोक कुकडे – आरोग्य
2. कुलदीप नायर (मरणोत्तर) पत्रकारिता
3. बच्छेंद्री पाल – क्रीडा

पद्मश्री
1. मनोज वाजपेयी – कला
2. सुनिल छेत्री (फुटबॉल) – क्रीडा
3. दिनयार कॉंट्रॅक्‍टर – कला
4. प्रभू देवा – नृत्य
5. गौतम गंभीर – क्रीडा
6. रोहिणी गोडबोले – विज्ञान
7. कादर खान (मरणोत्तर) – कला
8. सुदाम काते – आरोग्य
9. वामन केंद्रे – कला
10. रवींद्र आणि स्मिता कोल्हे – आरोग्य
11. शंकर महादेवन – कला
12. नगीनदास संघवी – शिक्षण
13. शब्बीर सय्यद – सामाजिक कार्य
14. आनंदन शिवमणी – कला
15. अजय ठाकूर (कबड्डी) – क्रीडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)