बाबासाहेब आंबेडकरांच्या नावात ‘रामजी’ वापरायचा शासनादेश

लखनऊ : घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव ‘डॉ. भीमराव रामजी आंबेडकर’ असेे पूर्ण नाव वापरले पाहिजे, असा शासनादेश उत्तर प्रदेश सरकारने जारी केला आहे. उत्तर प्रदेशात बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भीमराव आंबेडकर असे लिहिले जात होते. आता त्यांच्या या नावात त्यांच्या वडिलांचे नावही समाविष्ट केले जाणार आहे.

रामजी मालोजी सकपाळ हे बाबासाहेब आंबेडकर यांचे वडिल होते. बाबासाहेब आंबेडकर सही करतानाही भीमराव रामजी आंबेडकर अशीच सही करत. त्याचमुळे उत्तरप्रदेशात आता बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भीमराव रामजी आंबेडकर असे लिहिले जाणार आहे. राज्यपाल राम नाईक यांच्या सल्ल्यानंतर हा बदल केला जणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्थात भीमराव आंबेडकर यांच्या नावात त्यांच्या वडिलांच्या नावाचा समावेश करण्यासाठी २०१७ मध्ये एक कँपेन चालवण्यात आले होते. त्यावेळी राम नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्रही लिहिले होते. एका इंग्रजी वृत्तपत्राने या या संदर्भातले वृत्त दिले आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)