बाबरी मशीद तोडली हिंदू तालिबानने – सुन्नी वक्‍फ बोर्ड

नवी दिल्ली – बाबरी मशीद हिंदू तालिबानने तोडली असा दावा सर्वोच्च न्यायलयात करणंयात आला. मुस्लिम पक्षकार आणि सुन्नी वक्‍फ बोर्ड यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले, की ज्याप्रमाणे बामियान येथील बुद्धाची प्रतिमा मुस्लिम तालिबानन नष्ट केली, त्याचप्रमाणे बाबरी मशीद हिंदू तालिबानने तोडली.

शिया वक्‍फ बोर्डाने सांगितले, की बाबरी मशीद मीरे बाकी याने बनवली होती. मीर बाकी शिया होता. त्यामुळे बाबरी मशिदीच्या जमिनीपैकी मुस्लिमांच्य वाट्याला येणाऱ्या एक तृतीयांश जमिनीवर आपला हक्क असून ती जमीन राममंदिरासाठी देण्यास आपण तयार आहोत. या जमिनीशी सुन्नी मुस्लिमांचा काहीही संबंध नाही. हा प्रश्‍न आपन शांतीने सोडवू इच्छितो. देशाची एकता,शांती आणि सौहार्दासाठी उच्च न्यायालयाने दिलेली एक तृतीयांश जमीन आपण राममंदिरास देण्यास तयार असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

तत्पूर्वी मुस्लिम पक्षकार प्रकरण टाळण्याचा प्रयत्न करत असल्याचे उत्तर प्रदेश सरकारने गेल्या शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सांगितले होते. या प्रकरणाचा निर्णय होण्याची गेले शतकभर प्रतीक्षा केली जात असल्याचे उत्तर प्रदेश सरकारची बाजू मांडणारे ऍडिशनल सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले.

अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर 2010 मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या बाबतीतला युक्तिवाद पूर्ण होईपर्यंत हा मुद्दा कोणी मांडला नव्हता.

अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वी 533 साक्षी, 87 साक्षीदारांची निवेदने, 13,999 दस्तावेजांशिवाय विविध भाषांमधील सुमारे 1,000 पुस्तकांचा अभ्यास करण्यात आला होता. असेही त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)