बाबरी मशिदीच्या पक्षकाराला धमकी, अमेठीतून एकास अटक 

अयोध्या: बाबरी मशिद-रामजन्मभूमी प्रकरणातील एका पक्षकारास आज धमकी पत्र मिळाले आहे. हे धमकीचे पत्र पाठविणाऱ्या एकास पोलिसांनी अमेठीतून अटक केले आहे. या पत्रात इक्‍बाल अंसारी यांना धमकावत केस मागे घेण्यासह आणखी काही वादग्रस्त मुद्यांचा उल्लेख केला आहे. धमकीचे पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीचे नाव सूर्य प्रकाश सिंह असून तो विश्व हिंदू परिषदेचा गोरक्षा प्रमुख असल्याची माहिती मिळाली आहे.

धमकीच्या पत्रात म्हटले आहे की, बाबरी पक्षकार व्यवस्थित वागले तर त्यांची गळाभेट घेतली जाईल. मात्र, असे न झाल्यास त्यांना सीमेपार पाठविले जाईल. पोलिसांच्या माहितीनुसार पत्र पाठविणाऱ्या सूर्यप्रकाशने देखील पत्र दिल्याचे कबुल केले आहे. अंसारी यांना हे पत्र कुरियरने पाठविण्यात आले होते. हे धमकिचे पत्र मिळत्याच त्यांनी याविषयी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सूर्यप्रकाशला अटक केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या पत्रामुळे अंसारी आणि त्यांना परिवार दहशतीखाली आला असून त्यांनी चौकशीची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वीच अंसारी यांनी योगी सरकारकडे सुरक्षेची मागणी केली होती. हे पत्र मिळाल्यांनतर अंसारी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)