बाबरमाचीत शेतकऱ्यांनी रोखली रेल्वेची मोजणी

कराड – दुहेरी रेल्वे मार्गाच्या भुसंपादनासाठी बाबरमाची येथे आलेल्या रेल्वे अधिकारी व मोजणी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी रोखत प्रथम 1968 साली रेल्वे मार्गासाठी घेतलेल्या जमिनीची कागदपत्रे दाखवा. तसेच त्यावेळी घेतलेल्या व नव्याने घेणाऱ्या ज्मिनीचे पैसे आधी द्या मगच जमीन घ्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. रेल्वे प्रशासनाने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

सध्या पुणे-मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी जमीन संपादन करण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे. गुरूवारी बाबरमाची येथे रेल्वे अधिकारी व मोजणी अधिकारी येणार असल्याच्या नोटीस बाधित शेतकऱ्यांना बजावण्यात आल्या होत्या त्यानुसार, गुरूवारी नायब तहसीलदार विजय माने, तलाठी एस. जे मर्ढेकर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत यादव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, बाबरमाचीचे उपसरपंच सुरेश पाटील, तुकाराम खोचरे, गणेश साळुंखे, सुरेश माने आदींची प्रमुख उपस्थीती होती.

प्रशांत यादव व सुरेश माने म्हणाले, रेल्वे प्रशासनाने 1968 साली घेतलेल्या जमिनीचा अद्याप मोबदला दिला नाही. वास्तविक त्यावेळी शासनाने भुसंपादनाची कुठलीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे बाबरमाची येथील शेतकऱ्यांची नावे आजही सातबारा उताऱ्याला आहेत. रेल्वेच्या जागेचा करही शेतकरीच भरत आहेत. त्यामुळे शासनाने प्रथम 1968 साली रेल्वे मार्गासाठी घेतलेल्या जागेचा व आता नव्याने घेणाऱ्या जागेचा मोबदला आधी द्यावा, मगच आमच्या शेतात पाय ठेवावेत. सचिन नलवडे म्हणाले, रेल्वे प्रशासनाने पूर्वी घेतलेल्या व आता नव्याने घेणाऱ्या जमिनीचे एकत्रीत मोजणी करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मोबदला द्यावा.

रेल्वेलाईनवर झोपणार…

रेल्वे व महसूल प्रशासनाने दुहेरी मार्गासाठी जागा घेताना शेतकऱ्यांचे पूर्ण समाधान करावे, शेतकऱ्यांवर अन्याय करू नये. रेल्वे प्रशासनाला जमीन द्यायला शेतकरी तयार आहे. मात्र शासनाने पूर्वी घेतलेल्या जमिनीचे रेकॉर्ड दाखवावे, अन्यथा पूर्वी घेतलेल्या व नव्याने घेणाऱ्या जमिनीचा मोबदला आधी द्यावा व मगच जमिनीची मोजणी करावी. शासनाने शेतकऱ्यांविरोधात जबरदस्ती केल्यास शेतकरी रेल्वे लाईनवर झोपेल असा इशारा प्रशांत यादव यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)