तळेगाव एमआयडीसी – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (पुणे) यांच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे ह. रा. बाफना विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत घवघवीत यश संपादन केले.

या परीक्षेत द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी निकिता मापारी, स्नेहा जाधव, सोनाली कुंभार व प्रथम वर्षाच्या कोमल गायकवाड, पूजा घेनंद, आसावरी भसे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.

संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले, सचिव अशोक बाफना, उपाध्यक्ष मालपोटे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केले. विद्यालयाचे प्राचार्य हिरामण लंघे, प्रा. राजेंद्र डोके, मनोज गायकवाड, शुभांगी हेंद्रे, विजय रढे, योगेश जाधव, शीतल गवई यांनी घेतलेल्या विशेष परिश्रमासाठी सर्व शिक्षकांचे कौतुक करून सत्कार करण्यात आला. प्रमोद शिंदे, सोमनाथ धोंगडे यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)