• खरेदीसाठी कामशेतमध्ये प्रचंड गर्दी

कामशेत – गणेश चतुर्थी दोन दिवसांवर आली असून, प्रत्येक जण आपापल्या बाप्पाची आतुरतेने वाट पाहत आहे. आपला गणपती घरी येण्यापूर्वी घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सजावट करण्यासाठी गणेश मंडळ व नागरिक प्रयत्न करत असतात. गणपतीच्या काळात घरामध्ये सजावटीसाठी लागणारे वेगवेगळी साधनांनी आता कामशेत बाजारपेठ सजलेली दिसत आहे.

कामशेत बाजारपेठेतील दुकानात गणपतीच्या काळात सजावटीसाठी लागणारे हार, रंगेबेरंगी कापड, वेगवेगळी कापडी फुले, मण्यांच्या चकाकणाऱ्या माळा, पाठ, रंगेबेरंगी लाईटिंग आदी अनेक सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठ सजलेली आहे. कामशेत ही मावळातील प्रमुख बाजारपेठ आहे. परिसरातील 60-70 खेड्यांचे प्रमुख ठिकाण आहे. त्यात मंगळवारी आठवडे बाजारामुळे परिसरातील नागरिकांनी खरेदीसाठी कामशेतमध्ये प्रचंड गर्दी केलेली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)