बाप्पांच्या विसर्जनासाठी प्रशासन सज्ज

पिंपरी – शहरात बाप्पांचे  रविवारी (दि.23) पिंपरी व चिंचवड येथे विसर्जन होणार आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात आली असून विसर्जनाच्या 35 ठिकाणी 62 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पिंपरी, चिंचवड व भोसरी येथे नदी व तलाव असे छोटे-मोठे 48 घाट, 2 खाण, 32 हौद, एक विहीर याठिकाणी विसर्जन होणार आहे. यासाठी भोसरी, पिंपरी व चिंचवड येथे तीन ठिकाणी स्वागत कक्ष उभारण्यात येत आहेत. यातील मुख्य 26 घाटावर 60 सुरक्षा रक्षक असणार असून चार बचाव बोटी, अग्निशमन दलाचे जवान, लाईफ जॅकेट आदींची सोय करुन देण्यात आली आहे. यावेळी मूर्तीदान तसेच हौदातील गणपतींच्या विसर्जनाचीही सोय करण्यात आली आहे. तसेच 22 निर्माल्य कलश, 36 निर्माल्य कुंड असणार आहेत.

-Ads-

अग्निशामक दलाच्या वतीने पिंपरी-चिंचवड येथील विसर्जनासाठी एकूण तीन गाड्या असतील. त्यातील एक गाडी चिंचवड येथील चापेकर चौकात, एक पिंपरी चौकात तसेच एक गाडी ही फिरतीवर असणार आहे. बचाव कार्यासाठी एकूण 22 जवान यावेळी कार्यरत असणार असून 40 लाईफ जॅकेटही यावेळी देण्यात येणार आहेत. तसेच यावेळी विसर्जनासाठीही बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी आरोग्य विभागाच्या वतीनेही घाटावर योग्य ती दक्षता घेण्यात येणार असून यावेळी स्वाईन फ्ल्यू बाबतही जनजागृती करण्यात येणार आहे. नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सर्व सहकार्य केले जाईल मात्र यावेळी नागरिकांनीही सुरक्षेचा विचार करत केवळ अधिकृत घाटांवरुन विसर्जन करावे, निर्माल्य कलशातच टाकावे तसेच यावेळी प्रशासनाला योग्य ते सहकार्य करावे असे आवाहन सहायक आयुक्त दिलीप गावडे यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)