बाप्पांच्या मूर्तीवरून फिरताहेत अखेरचे हात

अवसरी -गणपती बाप्पांच्या आगमनाला आता काही दिवस राहिले असल्यामुळे श्रींच्या मूर्ती बनविण्याचे व रंगरंगोटी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आदर्शगाव गावडेवाडी (ता.आंबेगाव) येथील कारागीर मूर्तीवरून अखेरचा हात फिरवत आहेत. मूर्ती बनविन्यासाठी लागणारा कच्चा माल प्लास्टर ऑफ पॅरिस रंग पिओपी ब्रश स्टीनर आदी साहित्य राजस्थानवरून आणावे लागत आहे. त्यामुळे यावर्षी 10 ते 15 टक्‍के किंमतीत वाढ झाली आहे, अशी माहिती श्रीधर राजगुरू यांनी दिली. श्री गणेशाच्या आगमनापूर्वीच खेड, आंबेगाव, शिरूर, कामशेत, नाशिक आदी भागातील विक्रेते आमच्याकडे बुकींग करतात. यावर्षी श्रीमंत दगडुशेठ हलवाई, बाहुबली, लालबागचा राजा, जय मल्हार, कसबा या मूर्तीचे ग्राहकांकडून विशेष मागणी आहे. 6 इंचापासून 7 फुट उंचीपर्यंतच्या मूर्ती बनविण्याचे काम वर्षभर सरू असते. अखेरच्या टप्प्यात कामाला गती द्यावी लागते. असे श्रीधर राजगुरू, मयुर कराळे, शशिकांत भोर, योगेश गायकवाड, दत्ता साळवे आदींनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)