चिंबळी- गणेश उत्सवजवळ आल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक कारागीर गणेश मूर्ती बनविण्यात मग्न झाले आहेत. सध्या मूर्तींवर रंगकाम करण्याचे काम वेगात सुरू आहे. गणेशोत्सवात आकर्षक गणेश मूर्तींना मोठ्या प्रमाणावर मागणी असते, त्यामुळे अनेक कारागीर आकर्षक मूर्ती बनवत असून त्याचे रंगकाम अंतिम टप्प्यात आल्याचे दिसून येत आहे.
खेड तालुक्‍यातील औद्योगिक क्षेत्रात असलेल्या कुरुळी, चिंबळी, मोई, निघोजे, केळगाव, मरकळ, सोळू, धानोरे आदी परिसरात छोट्या मोठ्या मडाळांनी गणेश मूर्तींचे बुकिंग केले आहे. या वर्षी मूर्तींची किंमत 151 पासून दहा हजारापर्यंत असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. चिंबळी, कुरुळी, निघोजे, केळगांव, माजगांव, मरकळ, मोई, मोशी, डुडूळगांव परिसरात सार्वजनिक गणेश मंडाळांची मंडप उभारण्याची लगबग सुरू झाली आहे
13 ऑगस्ट रोजी गणपती उत्सवाला सुरुवात होत आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक सण म्हणून याकडे पाहिले जाते. अगदी अर्ध्या फुटापासून ते पन्नास फुटांपर्यंतच्या मूर्तीं उत्सवात पाहावयास मिळतात. पूर्वी ठराविक ठिकाणी गणेश मूर्तीं बनविल्या जात असत. आता याकडे रोजगाराचे साधन म्हणून पाहिले जात असून, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मूर्तीं बनविल्या जात आहेत. सध्या या कामांना वेग आला असून रंगकाम अंतिम टप्प्यात आले आहे. यावेळी दहा दिवसांच्या उत्सवात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)