बापूसाहेब गावडे विद्यालयाचे विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्तायादीत

टाकळी हाजी- टाकळी हाजी तालुका शिरूर येथील बापूसाहेब गावडे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती आणि एनएमएमएस परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. इयत्ता पाचवीतील पायल भानुदास काणे हिने 226 गुण मिळवून शिष्यवृत्ती मिळवली आहे.
या विद्यार्थिनीला एल.आर. सोदक, एस.सी.गावडे, डी.एम.सोनवणे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले आहे. तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत साक्षी रामदास किऱ्हे हिने शिष्यवृत्ती मिळवली आहे. या विद्यार्थ्यांना के. एन. चौधरी, ए. बी. जाधव, एम. व्ही. गायकवाड, एस.एम. वाघमारे, पर्यवेक्षक जे.डी. हारोळे, प्राचार्य आर. बी. गावडे यांनी मार्गदर्शन केले.
एनएमएमएस परीक्षेत देखील विद्यार्थी गुणवत्तायादीत आल्याचे प्राचार्य आर. बी. गावडे यांनी सांगितले. त्यामध्ये साक्षी रामदास किऱ्हे, पुष्पांजली अशोक महतो, साक्षी अरुण पोकळे, ऋतुजा रोहिदास खामकर, सौरभ सूर्यभान खामकर हे विद्यार्थी गुणवत्तायादीत आले आहेत. या विद्यार्थ्यांना रोहिदास मांजरे यांनी मार्गदर्शन केले. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष आणि माजी आमदार पोपटराव गावडे, जि.प. सदस्या सुनिता गावडे, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे, पंचायत समिती सदस्या अरुणा घोडे, सरपंच दामू घोडे यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)