बापरे! ‘या’ देशातील नागरिकांनी तब्बल ४० वर्षांनी पाहिला चित्रपट

रियाध : चित्रपट पाहणे धर्मविरोधी असल्याचे सांगत ४ वर्षांपूर्वी सौदी अरेबियामध्ये चित्रपट पाहण्यास बंदी घालण्यात आली होती. ती आता तब्बल चाळीस वर्षानंतर उठविण्यात आली आहे. इतक्या मोठ्या कालखंडानंतर सौदी अरेबियात्र बुधवारी चित्रपट दाखवण्यात आला. त्याला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.

सौदी अरेबियातील पहिले चित्रपटगृह राजधानी रियाध येथे बांधण्यात आले असून बुधवारी या चित्रपटगृहाचे उद्घाटन करण्यात आले. सध्या गाजत असलेला ब्लॅक पँथर हा चित्रपट यावेळी दाखविण्यात आला.

सौदी अरेबियामध्ये १९८० साली चित्रपटांवर बंदी घालण्यात आली होती.  मात्र, आता तब्बल ४० वर्षांनी ही बंदी उठविण्यात आली असून देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी चित्रपटगृहे बांधण्याचे काम सुरू आहे. २०३० पर्यंत सौदी अरेबियात ३५० चित्रपटगृहे बांधण्यात येणार असून यात २५०० स्क्रीन असणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)