बापट यांनी श्री अंबाबाई मंदिराचे विधेयक विधिमंडळात मांडले

श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यास शासनास भाग पाडू : आमदार राजेश क्षीरसागर


आज दोन्ही सभागृहात होणार चर्चा

कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिरातील श्रीपूजक हटावून शासनाने पगारी पुजारी नेमावेत, या मागणीसाठी जून महिन्यापासून जनआंदोलन सुरु आहे.

मी विधानसभा सभागृहात उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्नास उत्तर देताना, राज्य शासनाने ही मागणी मान्य केली असून हिवाळी 2017 अधिवेशापुर्वी शिर्डी, पंढरपूर देवस्थानच्या धर्तीवर श्री अंबाबाई मंदिरात शासनाचे पगारी पुजारी नेमण्याबाबत कायदा करण्यात येणार असल्याची ग्वाही विधी व न्याय राज्यमंत्री ना. रणजीत पाटील यांनी दिली होती. परंतु हिवाळी अधिविशेन संपून मार्च अधिवेशन संपत आले तरीही शासनाकडून पगारी पुजारी नेमण्याबाबतचे विधेयक सादर होत नसल्याने या प्रश्नाबाबत वारंवार पाठपुरावा केला.

या पाठपुराव्यास यश मिळाले असल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगत सिद्धिविनायक, शिर्डी, पंढरपूर देवस्थानच्या धर्तीवर कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात शासनाचे पगारी पुजारी नेमण्यास शासनास भाग पाडू, असे सांगितले.

मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज संसदीय कार्यमंत्री नाम. गिरीश बापट यांनी, अधिवेशन कामकाजावरील बाब क्रमांक अकरा अ (6) अन्वये सन 2018 चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर कोल्हापूर, हे विधेयक विधानसभेत मांडले. या विषयावर उद्या विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहामध्ये चर्चा होणार असून, या चर्चे मध्ये सहभागी होणार असल्याची माहितीही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.

आमदार राजेश क्षीरसागर यांनी उद्याच्या चर्चेमध्ये सहभागी होत असताना, करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पंढरपूर, शिर्डी मंदिरांच्या धर्तीवर शासनाचे पगारी पुजारी नेमावेत यासाठी समस्त करवीरवासियांच्यावातीने आंदोलन सुरु आहे. श्री अंबाबाई मंदिरामध्ये जमा होणाऱ्या देणगीची वारसदार पुजाऱ्याकडून लुट होत असून, गेले कित्तेक वर्ष श्री अंबाबाई मंदिरामध्ये मुलभूत सोई सुविधांचा वाणवा आहे. जुलै 2017 च्या अधिवेशनामध्ये मी उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्नाच्या चर्चेवेळी, श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमावेत यासाठी हिवाळी अधिवेशनात कायदा करण्यात येईल, अशी आश्वासने राज्याच्या मंत्री महोदयांनी दिली आहेत. परंतु या आश्वासनाची आजतागायत पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे श्री अंबाबाई मंदिरामध्ये पगारी पुजारी नेमावेत, यासाठी स्वतंत्र कायदा शासनाने तयार करून पारित करावा, अशी आपली आग्रही मागणी आहे.

यासह पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती मध्ये झालेल्या घोटाळ्यांबाबत आपण लक्षवेधी उपस्थित केली असून, मा. मुख्यमंत्री महोदयांनी यास एसआयटी समिती नेमून चौकशी करण्याचे आश्वासन आपणास दिले. परंतु याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे या दोन्ही विषयी चर्चा होवून शासनास सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडू, असेही आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)